75% अनुदानावर शेळी, गाई म्हशी गट वाटप योजना || sheli, gai mhashi subsidy yojna
बुलढाणा जिल्हा परिषदेअंतर्गत विशेष घटक योजनेतून ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरे व शेळ्यांचे गट वाटप केले जाणार आहेत. या योजनेचा लाभ देण्यासाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रीया पंचायत समिती स्तरावर पशुसंवर्धन विभागामार्फत सुरू करण्यात आली आहे. संबंधित लाभार्थ्यांकडून २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.