९०% अनुदानावर पाईप, ताडपत्री, बॅटरी स्प्रेयर, जिल्हा परिषद योजना अर्ज सुरू

 जिल्हा परिषद अकोला उपकर योजना 2021

जिल्हा परिषद अकोला कृषी विभागामार्फत जिल्हा परिषद उपकर योजना २०२१-२२ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी ज्या योजना राबविण्यात येतात; त्यासाठी  शेतकऱ्यांकडून पंचायत समितीस्तरावर दि.३१ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.



याअंतर्गत सर्वसाधारण शेतकऱ्यांसाठी ९० टक्के अनुदानावर एचडीपीई पाईप पुरविणे, 

९० टक्के अनुदानावर सोयाबिन स्वच्छ करण्याकरीता स्पायरल सेपरेटर/ ग्रेडर पुरविणे,  

 ९० टक्के अनुदानावर बॅटरी चलित  पॉवर स्प्रेअर पुरविणे, 

 ९० टक्के अनुदानावर प्लास्टिक ताडपत्री(४५० जी.एस.एम.) पुरविणे. या योजना राबविण्यात येतात.

यासाठी शेतकऱ्यांनी आपले अर्ज पंचायत समितीस्तरावर दि.३१ जुलै पर्यंत द्यावे.  

अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित पंचायत समितीतील कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी विभाग जिल्हा परिषद येथे संपर्क साधावा असे आवाहन  जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती पंजाबराव वडाळ आणि कृषी विकास अधिकारी डॉ. मुरलीधर इंगळे यांनी केले आहे.