bandhkam kamgar nondani online कशी करावी , कोणत्या योजनांचा लाभ मिळतो पाहूया सविस्तर.
पहा कशी करायची बांधकाम कामगार नोंदणी, बांधकाम कामगारासाठी असलेल्या योजनाची माहिती
bandhkam kamgar nondani online
bandhkam kamgar nondani |
mahabocw worker registration & schemes
सन २००१ च्या जनगणनेनुसार राज्यात एकुण सुमारे १४.०९ लाख इतके बांधकाम कामगार आहेत. तथापी अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नाही. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्येत १५.९९% झालेली वाढ विचारात घेता ढोबळमानाने बांधकाम कामगारांची संख्या १७.५० लाख इतकी अपेक्षित आहे.
बांधकाम नोंदणी ऑनलाईन कशी करावी पहा खालील विडिओ मध्ये
- १८ ते ६० वर्षे वयोगटातील बांधकाम कामगार
- मागील बारा महिन्यांमध्ये 90 दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केलेले कामगार
- वयाचा पुरावा
- 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- रहिवासी पुरावा
- ओळखपत्र पुरावा
- पासपोर्ट आकाराचे 3 फोटो
- इमारती,
- रस्त्यावर,
- रस्ते,
- रेल्वे,
- ट्रामवेज
- एअरफील्ड,
- सिंचन,
- ड्रेनेज,
- तटबंध आणि नेव्हिगेशन वर्क्स,
- स्टॉर्म वॉटर ड्रेनेज वर्क्ससह,
- निर्मिती,
- पारेषण आणि पॉवर वितरण,
- पाणी वितरणासाठी चॅनल समाविष्ट करणे
- तेल आणि गॅसची स्थापना,
- इलेक्ट्रिक लाईन्स,
- वायरलेस,
- रेडिओ,
- दूरदर्शन,
- दूरध्वनी,
- टेलीग्राफ आणि ओव्हरसीज कम्युनिकेशन्स,
- डॅम
- नद्या,
- रक्षक,
- पाणीपुरवठा,
- टनेल,
- पुल,
- पदवीधर,
- जलविद्युत,
- पाइपलाइन,
- टावर्स,
- कूलिंग टॉवर्स
- ट्रान्समिशन टावर्स आणि अशा इतर कार्य,
- दगड कापणे, फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणे.,
- लादी किंवा टाईल्स कापणे व पॉलिश करणे.,
- रंग, वॉर्निश लावणे, इत्यादीसह सुतारकाम.,
- गटार व नळजोडणीची कामे.,
- वायरिंग, वितरण, तावदान बसविणे इत्यादीसहित विद्युत कामे.,
- अग्निशमन यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- वातानुकूलित यंत्रणा बसविणे व तिची दुरुस्ती करणे.,
- उद्वाहने, स्वयंचलित जिने इत्यादी बसविणे.,
- सुरक्षा दरवाजे उपकरणे इत्यादी बसविणे.,
- लोखंडाच्या किंवा धातुच्या ग्रिल्स, खिडक्या, दरवाजे तयार करणे व बसविणे.,
- जलसंचयन संरचनेचे बांधकाम करणे.,
- सुतारकाम करणे, आभाशी छत, प्रकाश व्यवस्था, प्लास्टर ऑफ पेरीस यांसहित अंतर्गत (सजावटीचे) काम.,
- काच कापणे, काचरोगण लावणे व काचेची तावदाने बसविणे.,
- कारखाना अधिनियम, 1948 खाली समावेश नसलेल्या विटा, छप्परांवरील कौल इत्यादी तयार करणे.,
- सौर तावदाने इत्यादींसारखी ऊर्जाक्षम उपकरण बसविणे.,
- स्वयंपाकखोली सारख्या ठिकाणी वापरण्यासाठी मोडुलर (आधुनिक) युनिट बसविणे.,
- सिमेन्ट काँक्रिटच्या साचेबद्ध वस्तू इत्यादी तयार करणे व बसविणे.,
- जलतरण तलाव, गोल्फचे मैदान इत्यादीसह खेळ किंवा मनोरंजनाच्या सुविधांचे बांधकाम करणे.,
- माहिती फलक, रोड फर्निचर, प्रवाशी निवारे किंवा बसस्थानके, सिग्नल यंत्रणा इत्यादी बांधणे किंवा उभारणे.,
- रोटरीजचे बांधकाम करणे, कारंजे बसविणे इत्यादी.,
- सार्वजनिक उद्याने, पदपथ, रमणीय भू-प्रदेश इत्यादींचे बांधकाम.
नोंदणी फी- रू. 25/- व वार्षिक वर्गणी रू.60/- (5 वर्षाकरिता) व मासिक वर्गणी रु.1/-
ऑफलाईन अर्जाचा नमुना mahabocw worker registration offline form खालील लिंक वर मिळेल
Mahabocw worker registration offline form
बांधकाम कामगार योजना चा अर्ज कसा करायचा हे देखील पहा
👇
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना १ ली ते ७ वी साठी प्रतिवर्षी रू.२५००/- किंवा इ.८ वी ते १० वी साठी प्रतिवर्षी रू.५०००
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता १० वी व १२ वी मध्ये ५०% किंवा अधिक गुण मिळाल्यास रू.१०,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना इयत्ता ११ वी व १२ वी च्या शिक्षणासाठी प्रति शैक्षणिक वर्षी रू.१०,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस पदवी च्या प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षाच्या पुस्तके व शैक्षणिक सामुग्रीसाठी प्रतिवर्षी रू. २०,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना आणि पत्नीस वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रतिवर्षी रू.१,००,०००/- व अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाकरिता रू.६०,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पहिल्या दोन पाल्यांना शासनमान्य पदविकेकरिता प्रतिवर्षी रू.२०,०००/- व पदव्युत्तर पदविकेकरिता रू.२५,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांना संगणकाचे शिक्षण MSCIT करिता शुल्काची प्रतिपूर्ती.
- नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन जीवित अपत्यांच्या नैसर्गिक प्रसूतीसाठी रु. १५,०००/- व शस्त्रक्रियेद्वारे प्रसूतीसाठी रु. २०,०००/-
- नोंदीत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबियांना गंभीर आजाराच्या उपचारार्थ रू.१,००,०००/- (आरोग्यविमा योजना लागू नसल्यासच)
- पती/पत्नीने पहिला मुलीच्या जन्मानंतर कुटूंब नियोजनाची शस्त्रक्रिया केल्यास त्या मुलीच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेत १८ वर्षापर्यंत रू.१,००,००० मुदत बंद ठेव
- नोंदीत बांधकाम कामगारास ७५% अपंगत्व आल्यास रू.२,००,०००/- अर्थसहाय्य
- नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य योजना
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा बांधकामाच्या ठिकाणी अपघाती मृत्यू झाल्यास त्याच्या कायदेशीर वारसास रू.५,००,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास रू.२,००,०००/-
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरखरेदी किंवा घरबांधणीकरता बँकेकडून घेतलेल्या गृहकर्जावरील रू.६ लक्ष पर्यतच्या व्याजाची रक्कम अथवा रू.२ लक्ष अनुदान.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंत्यविधी करिता रू. १०,०००/-.
- नोंदणीकृत बांधकाम कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या विधवा पत्नी अथवा स्त्री कामगाराच्या विधुर पतीस रू.२४,०००/- (५ वर्षांकरिता) ,(प्रति वर्षी अर्ज करणे आवश्क्य राहील).
- नोंदीत बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चाच्या प्रतिपूर्तीसाठी रु.३०,०००/-.
- व्यक्तिमत्व विकास पुस्तक संचाचे वाटप.
- नोंदीत बांधकाम कामगारास हत्यारे /अवजारे खरेदी करण्याकरिता रू.५०००/-. अर्थसहाय्य
- नोंदीत बांधकाम कामगारांसाठी प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना.
- नोंदीत बांधकाम कामगारासाठी प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना.
- नोंदीत बांधकाम कामगारासाठी कौशल्य वृद्धीकरण योजना.