तुमचं लसीकरण झालं असेल, तर त्याचं प्रमाणपत्र आता तुम्हाला व्हाट्सअप्प वर सुध्धा मिळनार आहे.
सरकारने MyGov Corona HelpDesk व्हॉट्सअॅप चॅट केलं आहे.
या चॅटचा वापर करून आता तुम्ही कोविड लसीकरण प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता.
यासाठी
* तुम्हाला आपल्या मोबाईल मध्ये 9013151515 हा नंबर Covid Certificate असा सेव्ह करायचा आहे.
* यानंतर व्हॉट्सअॅप ओपन करा आणि सर्च बारमध्ये हा Covid Certificate नंबर शोधा.
* हा नंबर मिळाल्यावर याच्या चॅट बॉक्समध्ये डाउनलोड सर्टिफिकेट - Download Certificate असं मेसेज टाईप करा.
* याच्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअॅप वरून एक 6 अंकी ओटीपी पाठविला जाईल.
* या चॅट बॉक्समध्ये हा OTP टाकावा लागेल. त्या नंबरवर जितक्या व्यक्तींची लसीकरण नोंदणी झाली असेल आणि त्यांना लस मिळाली असेल त्यांची यादी व्हॉट्सअॅपद्वारे पाठवली जाईल. त्यातून ज्या व्यक्तीचं सर्टिफिकेट हवं आहे, त्याचा नंबर टाईप करावा लागेल.
* आणि ताबडतोब तुम्हाला Covid-19 Vaccine Certificate pdf स्वरूपात पाठवलं जाईल जे तुम्ही सहज डाउनलोड करू शकता.