ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना, अटी पात्रता कागदपत्र || dragon fruit farming subsidy maharashtra

 

ड्रॅगन फ्रुट लागवड अनुदान योजना

  

Dragon fruit farming subsidy in maharashtra 

ड्रॅगन फ्रूट अर्थात भारतीय कमलम हे नाव असलेले एक निवडुंग परिवारातील अत्यंत महत्त्वपूर्ण फळ आहे. 

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत विदेशी फळपिक ड्रॅगनफ्रुट लागवड या घटकाच्या मार्गदर्शक सुचना निर्गमित करणेबाबत....👇

ड्रॅगन फ्रुट मधील औषधी गुण, पोषक द्रव्ये याचा विचार करून कृषी विभागाने महाराष्ट्रात २०२१ २२ या वर्षांपासून राष्ट्रीय एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत ( national Integrated Horticulture Development Mission) ड्रॅगन फ्रूट लागवडी साठी हेक्टरी १ लाख ६० हजार अनुदान देण्यास सुरू केले आहे.




ड्रॅगनफ्रूट या फळामध्ये अधिक प्रमाणात उपलब्ध असणारे पोषक तत्त्व आणि अँटिऑक्‍सिडंटमुळे या फळास सुपर फ्रूट म्हणून प्रसिद्धी मिळत आहे. फळात विविध औषधी गुण, फॉस्फरस, कॅल्शियम अधिक प्रमाणात आढळतात. 

पाण्याची टंचाई निर्माण झाली तरी ही झाडे कायमची टिकून राहतात. या फळाला रोग व किडींचा प्रादुर्भाव नगण्य असून पीक संरक्षणावर जास्त खर्च येत नाही. भारतीय बाजारपेठेमध्ये या फळाची मागणी व पिकाचे क्षेत्र वाढत आहे. 

ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी लागवड साहित्य, आधार पद्धत, ठिबक सिंचन, खते व पीक संरक्षण यासाठी अनुदान देय आहे. प्रति हेक्‍टर चार लाख रुपये प्रकल्पमूल्य ग्राह्य धरून 40 टक्‍क्‍यांप्रमाणे एक लाख 60 हजार रुपये प्रति हेक्‍टर अनुदान तीन वर्षात 60:20:20 या प्रमाणात देण्यात येते. दुसऱ्या वर्षी 75 टक्के व तिसऱ्या वर्षी 90 टक्के झाडे जिवंत असणे अनिवार्य राहील.लागवडीची पद्धत 

कागदपत्र नमुना




ड्रॅगनफ्रूट फळपिकाची लागवड करण्यासाठी जमिनीची पूर्व मशागत झाल्यावर दोन झाडांमध्ये 3 मीटर बाय 3 मीटर, 3 मीटर बाय 2.5 मीटर या अंतरावर खड्डे खोदून खड्ड्याच्या मधोमध सिमेंट कॉंक्रीटचा किमान 6 फूट उंचीचा खांब व त्यावर कॉंक्रिटची फ्रेम बसविण्यात यावी. सिमेंट कॉंक्रिट खांबाच्या एका बाजूला एक याप्रमाणे चार बाजूला चार रोपे लावावीत. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रूट लागवडीसाठी महाडीबीटी पोर्टलवर




 https://mahadbtmahait.gov.in उत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत.


ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती साठी हे ही पहा




ड्रॅगन फ्रुट लागवड माहिती साठी हेही पहा
Dragon fruit farming maharashtra