द्राक्ष, केळी व ड्रॅगनफ्रुट या फळांचा रोहयो योजनेत समावेश
आज ७ सप्टेंबर २०२१ रोजी रब्बी हंगाम 2021 राज्यस्तरीय नियोजन व आढावा बैठक कृषी आयुक्तालय, पुणे येथे घेण्यात आली,
या बैठकी मध्ये बोलताना राज्याचे कृषि मंत्री श्री दादाजी भूसे यांनी शेतकऱ्यांच्या अर्थकारणामध्ये रब्बी पिकांचे महत्त्व आहे. त्याअनुषंगाने चालू वर्षासाठी 60 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी लागणारी बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करुन देण्यात आले असल्याची माहिती दिली.
याच बैठकी मध्ये बोलताना राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी फळबाग लागवडीच्या माध्यमातून पूरक व्यवसायात वाढ करणे व उत्पादन वाढवणे हे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड योजनेचे उद्दिष्ट आहे. या वर्षात फळबाग लागवडीसाठी प्रति कृषि सहायक 10 हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवडीचे लक्षांक निश्चित करुन दिला असून राज्यात 18235.73 हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे.
याचबरोबर द्राक्ष, केळी व ड्रॅगनफ्रुट या फळांचा रोहयो योजनेत समावेश करण्यात आला असल्याचे माहिती माहिती देखील श्री. भुमरे माध्यमातून देण्यात आली.
आज पार पडलेल्या या रब्बी हंगाम 2021 राज्यस्तरीय नियोजन व आढावा बैठकीला कृषीमंत्री श्री. दादाजी भुसे ,फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, कृषी आयुक्त धीरज कुमार, सचिव एकनाथ डवले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव बोटे, कृषी विभागाचे संचालक व मंत्रालयीन अधिकारी, सहसंचालक व कृषी विद्यापीठांचे संशोधन संचालक, ठाणे, नाशिक, कोल्हापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर व अमरावती जिल्हयाचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, आत्माचे प्रकल्प संचालक व कृषि आयुक्तालय अधिकारी, उपस्थित होते.