नांदेड शहराला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाशी जोडण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
आणि यांच्या संदर्भातील शासन निर्णय आज ६ सप्टेंबर २०२१ रोजी निर्गमित करण्यात आला आहे
जालना नांदेड जिल्ह्याला मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाशी थेट द्रुतगती संपर्क मिळणार आहे. या जिल्ह्यातून मुंबई व औरंगाबाद येथे जाण्यासाठी कमी वेळ लागणार असून, त्यामुळे शेतकरी, व्यापारी, उद्योजक, प्रवासी अशा सर्वच घटकांना त्याचा लाभ होईल
हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गास जोडणाऱ्या जालना ते नांदेड द्रुतगती महामार्गाच्या बांधकामास मान्यता मिळणेबाबत.
नांदेड शहरातील हिंगोली गेट-बाफना चौक-देगलूर नाका ते छत्रपती चौक (धनेगाव जंक्शन) रस्त्याच्या सुधारणेसह, उड्डाणपुलाचे व गोदावरी नदीवरील पुलाचे बांधकाम करणे
या निर्णयानुसार समृद्धी महामार्गावरील जालना टी-पॉईंटपासून नांदेड शहरापर्यंत द्रुतगती महामार्गाचे बांधकाम होणार आहे. या प्रकल्पाने नांदेड जिल्ह्यासह हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांनासुद्धा समृद्धी महामार्गाला थेट आणि वेगवान कनेक्टिव्हिटी मिळेल. या प्रकल्पामुळे नांदेड-मुंबई, नांदेड-औरंगाबाद प्रवासासाठी लागणारा वेळ आणि पैसा दोन्ही वाचणार आहेत. जालना ते नांदेड द्रुतगती मार्गाची एकूण लांबी 194 किमी आहे. त्यासाठी अंदाजे 5 हजार कोटी रूपये असेल.
प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- जालना नांदेडला समृद्धी महामार्गाशी जोडल्यामुळे दळणवळण सुलभ होणार
- जालना नांदेड ते मुंबई व औरंगाबाद प्रवासात वेळ व पैशांची बचत होणार
- मालवाहतूकीचाही लाभ, थेट जेएनपीटीपर्यंत कनेक्टिव्हिटी मिळणार
- स्थानिक व्यावसायिकांना नवीन संधी उपलब्ध, विकासाला चालना