असंघटित कामगारांची ई- श्रम पोर्टलवर नोंदणी || eshram registration online

 राज्यभरात 26 ऑगस्ट 2021 पासून ई-श्रम पोर्टलवर ( eshram portal ) 




असंघटित कामगारांची नोंदणी सुरु करण्यात आली आहे. नोंदणी करण्यात येणाऱ्या कामगारांना ई-श्रमित कार्ड मिळणार आहे. राष्ट्रीय स्तरावर असंघटित कामगारांचा डेटाबेस तयार होण्याच्या उद्देशाने केंद्र शासनामार्फत नोंदणी करण्यात येत आहे. राज्यातील अंदाजे 3.65 कोटी असंघटित कामगारांना ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन कामगार विकास आयुक्त डॉ.आश्विनी जोशी यांनी केले आहे.



नोंदणीकरीता पात्रता :- 

असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारा वय वर्ष 16 ते 59 दरम्यानचा कामगार, 

कामगार आयकर भरणारा नसावा, 

कामगार कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी राज्य विमा योजनेचा सभासद नसावा.

वरीलप्रमाणे नमूद करण्यात आलेले निकष पूर्ण करण्यात आल्यानंतर नोंदणी प्रक्रिया पूर्ण होते.

नोंदणी कोठे करावी :- 

अशी करा नोंदणी , पहा लिंक वर क्लिक करून

स्वत:, नागरी सुविधा केंद्र (CSC), कामगार सुविधा केंद्र, 

eSHRAM Portal URL :  eshram.gov.in

नॅशनल हेल्पलाईन नंबर – 14434, 

टोल फ्री नंबर – 18001374150

 या नोंदणीकरीता नागरी सुविधा केंद्र / कामगार सुविधा केंद्रामार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही.