प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत ( pradhanmantri fasal bima yojana PMFBY ) पीक विमा घेतलेल्या शेतकऱ्यांनी यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या पीक नुकसानीचे दावे विमा कंपनी कडे केले होते, ज्याची संख्या ४२ लाखापर्यंत असल्याचं शासनाच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे.
याच क्लेम केलेल्या पात्र शेतकऱ्यांचे दावे निकालात काढण्यासाठी याचबरोबर पावसाच्या खंडामुळे नुकसान झालेल्या बाधित जिल्ह्यातील शेतकऱ्यांना २५% आगाऊ स्वरूपात वाटप करण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीसाठी पीक विमा कंपनीकडून राज्य सरकार व केंद्र सरकार कडे पहिला हप्ता निधी ची मागणी केली होती, त्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून यापूर्वीच ₹९७३ कोटी च राज्य हिस्स्याच्या पहिल्या हप्त्याच वितरण केले होते,
आणि आज अखेर केंद्र शासनाच्या माध्यमातून ही ₹ ८९९ कोटी रुपयांच वितरण करन्यात आला आहे.