राज्यस्तरीय नाविण्यपूर्ण योजना २०२१
Navinya purn yojana 2021
1000 मांसल कुक्कूट पक्षी कुक्कूटपालन अनुदान योजना
राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांसह पशुपालक व शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करुन त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करुन देणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने विविध योजना व उपक्रमांद्वारे ग्रामीण महाराष्ट्राचे अर्थचक्र गतिमान ठेवण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो.
याच पशुसंवर्धन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांमधील एक महत्वाची योजना 1000 मांसल कुक्कूट पक्षी वाटप करणे
1000 मांसल कुक्कूट पक्षी कुक्कूटपालन योजना, अटी पात्रता अनुदान कागदपत्रं
ही योजना या आर्थिक वर्षात मुंबई,मुंबई उपनगरे ह्या जिल्हया मध्ये राबवली जाणार नाही .
लाभार्थी निवडताना 30 टक्के महिला व 3 टक्के विकलांग लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात यावे.
लाभार्थी निवडीचे निकष
१) अत्यल्प भुधारक शेतकरी (१ हेक्टर पर्यतचे भुधारक)
२)अल्प भुधारक शेतकरी (१ ते २ हेक्टर पर्यतचे भुधारक )
३) सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोगार केंद्रात नोद असलेले)
४)महिला बचत गटातील लाभार्थी /वैयक्तिक महिला लाभार्थी (अक्रं १ ते ३ मधील)
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाइट
navinya purna yojana online application 2021
संकेतस्थळ: https://ah.mahabms.com
प्रकल्प खर्च
1000 मांसल कुक्कूट पक्षी कुक्कूटपालन अनुदान
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे -
१) * फोटो ओळखपत्राची सत्यप्रत (अनिवार्य )
२) * सातबारा (अनिवार्य)
३) * ८ अ उतारा (अनिवार्य)
४) * अपत्य दाखला (अनिवार्य ) / स्वघोषणा पत्र
५) * आधारकार्ड (अनिवार्य )
६) * रहिवासी प्रमाणपत्र (अनिवार्य )
७) * बँक खाते पासबुक सत्यपत्र (अनिवार्य )
८) * रेशनकार्ड / कुटुंब प्रमाणपत्र (एकाच कुटूंबातील एकच व्यक्तीला लाभ घेता येईल .) (अनिवार्य )
९) * ७-१२ मध्ये लाभार्थी चे नाव नसल्यास कुटुंबाचे संमती पत्र,अथवा दुसऱ्यांची जमीन भाडे तत्वावर करारनामा (असल्यास अनिवार्य)
१०) * अनुसूचीत जाती / जमाती असल्यास जातीच्या दाखल्याची सत्यप्रत (असल्यास अनिवार्य)
११) दारिद्र्य रेषेखालील असल्याचे प्रमाणपत्र (असल्यास अनिवार्य)
१२) दिव्यांग असल्यास दाखला
१३) बचत गट सदस्य असल्यास त्याचे प्रमाणपत्र किंवा बचत गटाच्या बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची साक्षांकित प्रत
१४) वय - जन्मतारखेचा पुरावा सत्यप्रत
१५) शैक्षणिक पात्रतेचा दाखला.
१६) रोजगार ,स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणीकार्डची सत्यप्रत
१७) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छायांकित प्रत
navinya purna yojana online application 2021,