कृषी पणन मंडळाचे नवे मोबाईल अँप शेतकऱ्यांच्या सेवेत
MSAMB New Application for farmer launched
MSAMB New Application for farmer launched |
सध्या मोबईलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असून आवश्यक माहिती एसएमएस अथवा अॅपद्वारे ( Mobile Android application ) सहज उपलब्ध होत आहे.
Website Link
शेतकरीदेखील मोठ्या प्रमाणावर मोबाईलचा वापर करत आहेत. कृषि पणन मंडळ MSAMB राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रम तसेच बाजारभाव ( Bajarbhav ) याबाबत माहिती शेतकरी, बाजार समित्या, बाजार घटक व सर्वसामान्यांना सहजरित्या उपलब्ध करुन देण्यासाठी कृषि पणन मंडळाने (MSAMB New Application for farmer launched ) मोबाईल अॅप अद्ययावत केले आहे.
या अॅपद्वारे कृषि पणन मंडळाच्या माहिती व्यतिरीक्त राज्यातील व इतर राज्यातील बाजार समित्यांमध्ये होणारी शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्यांची माहिती, बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती, कृषि पणन मित्र मासिक, फलोत्पादन निर्यात प्रशिक्षण, सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था आदी माहिती उपलब्ध आहे.
राज्यातील सर्व बाजार समित्यांना त्यांच्या आवारात आवक होणाऱ्या शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबत माहिती कृषि पणन मंडळाच्या अॅपद्वारे सहजरित्या भरता येणार आहे. यामुळे राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील बाजारभावाची माहिती एकत्रित करणे सोईचे होणार आहे. शेतमालाची थेट विक्री अथवा खरेदी करण्यासाठी विक्रेता व त्याचा शेतमाल आणि खरेदीदार व त्याचा शेतमाल याबाबत माहिती प्रसिद्ध करण्याची सुविधा या अॅपद्वारे उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळाचे मोबाईल अॅप गुगल प्ले स्टोअर व अॅप स्टोअरवर एमएसएएमबी (MSAMB) या नावाने मराठी व इंग्रजी या दोन भाषांमध्ये विनामूल्य उपलब्ध आहे.
अॅपमुळे मोबाईलद्वारे शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव, शेतकरी उत्पादक कंपन्या ( Farmer producer company ) ,कृषि पणन मित्र मासिक, राज्यातील सर्व बाजार समित्यांची संक्षिप्त माहिती,शेतमाल विक्रेता व खरेदीदार, कृषि पणन मंडळ राबवित असलेले विविध प्रकल्प, योजना व उपक्रमाची माहिती सहजरित्या मिळेल.
मोबाईल अॅपमुळे शेतकऱ्यांना शेतमालाचे बाजारभाव घरबसल्या उपलब्ध होणार आहेत.