कृषी उडान 2.0 योजनेत महाराष्ट्रासह 29 राज्यांचा समावेश | Krishi UDAN Yojana 2.0

कृषी उडान 2.0 योजनेत महाराष्ट्रासह 29 राज्यांचा समावेश

Krishi UDAN Yojana 2.0 

राज्यातील फलोत्पादन, मत्स्यपालन, पशुधन आणि प्रक्रिया उत्पादने यांसारख्या कृषी-उत्पादनांची हवाई वाहतूक वाढवण्यासाठी कृषी उडान योजना 2.0 ही योजना महत्वाची. 



देशातील प्रामुख्याने डोंगराळ भागईशान्येकडील राज्ये आणि आदिवासी भागातील नाशवंत अन्न उत्पादनांची वाहतूक करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या  कृषी उडान योजना 2.0 Krishi UDAN 2.0) ची घोषणा हि 27 ऑक्टोबर 2021 रोजी करण्यात आली असून या योजनेच्या विद्यमान तरतुदींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. 


कृषी उडान योजना 2.0 ( Krishi UDAN 2.0)  या योजने अंतर्गतहवाई वाहतुकीद्वारे कृषी-उत्पादनांची वाहतूक सुलभ करणे आणि त्याला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेभारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) प्रामुख्याने ईशान्यडोंगराळ आणि आदिवासी प्रदेशातील सुमारे 25 आणि इतर प्रदेश/क्षेत्रातील 28 विविमानतळांवर भारतीय मालवाहू आणि पी टू सी  (पॅसेंजर-टू-कार्गो) विमानांसाठी लँडिंगपार्किंगटर्मिनल नॅव्हिगेशनल लँडिंग शुल्क (टीएनएलसी) आणि रूट नेव्हिगेशन सुविधा शुल्क (आरएनएफसी) ही  शुल्क पूर्णपणे माफ करन्यात येते. 


कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी लॉजिस्टिक सेवा  बळकट करण्याच्या दृष्टीनेनागरी हवाई वाहतूक मंत्रालयकृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयपशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागमत्स्यव्यवसाय विभागअन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयवाणिज्य विभागआदिवासी व्यवहार मंत्रालयईशान्य  क्षेत्र विकास मंत्रालय अशी आठ मंत्रालये/विभाग त्यांच्या  विद्यमान योजनांचा लाभ देत परस्परांशी समन्वय साधत कृषी उडान  योजनेची  अंमलबजावणीत करतात. कृषी उडान योजनेंतर्गत कोणत्याही विशिष्ट निधीची तरतूद नाही,

अंदमान आणि निकोबारआंध्रप्रदेशअरुणाचलप्रदेशआसामबिहारचंदीगढछत्तीसगडगोवागुजरातहिमाचल प्रदेशजम्मू आणि काश्मीरझारखंडकेरळलदाखलक्षद्वीपमध्यप्रदेश

महाराष्ट्रमणिपूरमेघालयमिझोरामनागालँडपंजाबराजस्थानसिक्कीमतामिळनाडूत्रिपुराउत्तर प्रदेशउत्तराखंड आणि पश्चिम बंगाल.अशी 29 राज्ये कृषी उडान 2.0 योजनेअंतर्गत समाविष्ट आहेत.


आसामसह ईशान्य प्रदेशातील राज्यांमधील सर्व विमानतळ या योजनेंतर्गत समाविष्ट आहेत. फलोत्पादनमत्स्यउत्पादनपशुधन आणि प्रक्रिया उत्पादने यांसारख्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी हवाई वाहतूकीचा हिस्सा वाढवणे ,हा कृषी उडान योजना 2.0 चा मुख्य उद्देश आहे.

विशेषत: ईशान्येकडील (आसामसह) देशाच्या डोंगराळ आणि आदिवासी प्रदेशात उत्पादित होणाऱ्या  सर्व कृषी उत्पादनांसाठी विना  अडथळा किफायतशीरकालबद्ध  हवाई वाहतूक आणि संबंधित लॉजिस्टिक सुनिश्चित करणे  हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.