८०% अनुदानावर कृषी अवजार बँकेची स्थापना, या जिल्ह्यांचे अर्ज सुरू.
शेतकऱ्यांना कृषी यंत्र अवजारांसाठी अनुदान देणारी महत्वाची अशी योजना म्हणजे कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजना ( Agriculture Department Farm Mechanization Scheme )
राज्यातील चार आकांक्षित जिल्ह्यांमध्ये केंद्र शासनाद्वारे यापूर्वी कृषी कल्याण अभियान भाग-१ व भाग-२ मध्ये निवडलेल्या गावांमध्येच कृषी अवजारे बँक सुविधेचा लाभ देय राहणार आहे. या निवडक गावांतून ट्रॅक्टरची संख्या कमी प्रमाणात असलेली गावे, अल्प व अत्यल्प जमीनधारकांचे प्रमाण अधिक असलेली गावे व सध्या कृषी उत्पादकता वाढीस वाव असलेली गावे या योजनेसाठी पात्र असतील.
कृषी यांत्रिकीकरण उपविभाग 2021-22 अंतर्गत कृषी कल्याण अभियान योजना अंतर्गत भाडे तत्वावर कृषी यांत्रिकीकरण सेवा सुविधा पुरवठा साठी कृषी औजारे बँक स्थापना प्रति तालुका 2 या प्रमाणे 80 टक्के किंवा 8 लाख रुपये अनुदानावर राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे.
जिल्हयास प्रति तालुका 2 या प्रमाणे लक्षांक प्राप्त झालेला आहे तरी लाभ घेण्यास इच्छुक शेतकरी सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांचे नोंदणीकृत गट,नोंदणीकृत शेतकरी बचत गट व विविध कार्यकारी संस्था यांनी विहित नमुन्यात अर्ज जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, गडचिरोली कार्यालया मार्फत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालायात अर्ज मागविण्यात येत आहेत.
योजनेंचा लाभ घेण्यासाठी अर्जासोबत लागणारे कागदपत्रे पुढील प्रमाणे,
- संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र,
- खरेदी करावयाच्या यंत्र/औजारे संचाचे दरपत्रक व
- प्रशिक्षण पुरावा.
- आधार कार्ड सलग्न बँक खात्याचा पासबुक च्या पहिल्या पृष्ठाची छायांकित प्रत,
- संस्थेच्या सबंधित व्यक्तीच्या बॅक खात्यातून अनुदान जमा करण्यास संस्थेने प्राधिकृत केले असल्यास प्राधिकृत केल्याचे पत्र व सबंधित व्यक्तीचा आधार कार्ड/फोटो असलेल्या ओळख पत्राची स्वयंसाक्षांकित प्रत
- विहित नमुन्यातील अर्ज
दिनांक 20 फेब्रुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात संपूर्ण कागदपत्रासह सादर करावे त्यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यावी. योजनेच्या अधिक माहिती साठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी गडचिरोली यांनी केलेले आहे.
गडचिरोली जिल्हयात विविध योजने अंतर्गत यंत्र,औजारे व सिंचन सुविधा या बाबीकरीता वैयक्तिक व गटाकरीता लाभ देण्यात येत आहे तरी इच्छुक शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टल वर अर्ज करावे. व जिल्हयात नाविन्य पूर्ण बाबी खाली ड्रगन फ्रुट,काजू,स्ट्रोबेरी,हळद,आले,पाम,तैवान पेरु इत्यादी बाबी करीता इच्छुक नोंदणी कृत गटांनी अर्ज करावे.
लिंक -
कृषी कल्याण :-
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfMihzqDNhBH8v_lgz-jJ12631aeHVwD9rdLWz0OjwgIS9Y7Q/viewform?usp=sf_link
नाविण्यपूर्ण बाबींकरीता :- https://forms.gle/eSu4tr2Y4epR9Cr39