ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ | mantrimandal nirnay,

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ

मंत्रिमंडळ निर्णय | mantrimandal nirnay,

mantrimandal nirnay,
mantrimandal nirnay,


आज राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. 

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ करण्याचा निर्णय निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. 


आदिवासी लोकसंख्या 

  • 1500 पेक्षा जास्त असलेल्या भागात 75लाख रुपये, 
  • 1000 ते 1499 पेक्षा जास्त असलेल्या भागात 50 लाख रुपये, 
  • 500 ते 999 पेक्षा जास्त असलेल्या भागात 35 लाख रुपये, 
  • 499 पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या 25 लाख रुपये 

अशा सुधारीत आर्थिक निकषांमध्ये 5 वर्षांपर्यंत कामे घेता येतील.


“ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा” ही योजना सन 2021-22 पासून राज्यस्तरावर वर्ग करण्यात आली आहे. 

ही बाब विचारात घेऊन राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्र, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र,माडा,मिनीमाडा व आदिवासी उपयोजना बाह्य  क्षेत्राबाहेरील  50 टक्के व त्यापेक्षा जास्त अनुसुचित जमातीची  लोकसंख्या असलेल्या वस्त्या / पाडे / वाड्या / गाव/ नगर पंचायती / नगरपरिषदा /नगरपालिका /महानगरपालिका या मधील वार्ड/प्रभाग यांचा विकास करण्याबाबत सुचविण्यात येणाऱ्या कामांना सुधारीत निकष लावण्यात येतील.