कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांना मिळणार 10 हजार रूपये
COVID relief for children
पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करण्याचे आवाहन
कोविड-19 आजाराने एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना शैक्षणिक खर्चासाठी प्रत्येकी 10 हजार रुपये देण्यात येत आहेत. पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज करावा, असे आवाहन महिला बालविकास विभागाने केले आहे.
मा. सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल संकीर्ण प्रकरण 377/2018 (श्वेता ता दणाणे वि केंद्र शासन व इतर) मध्ये 20 ऑक्टोंबर,2021 रोजी देण्यात आलेले आदेशान्वये मा. सर्वाच्च न्यायालयाने महिला व बाल विकास विभागाच्या बाल न्याय निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
अर्थ सहाय्यासाठी आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे
पात्र लाभार्थी यांनी आपले तालुक्यातील
1) तहसीलदार सर्व तालुके
2)एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय सर्व तालुके
3)जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अर्जाचा विहित नमुना घेऊन आवश्यक कागदपत्रासह व मुळ अर्जासह प्रस्ताव वरील या तीन कार्यालयापैकी एका कार्यालयास जमा करावे,
अधिका माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, येथे संपर्क साधावा,