₹ ५०,००० सानुग्रह अनुदानाच्या अर्जासाठी शेवटची तारीख.
Corona anudan
माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिका सिविल गौरव कुमार बंसल विरुद्ध भारत सरकार मधील दिनांक 4 ऑक्टोबर 2021 रोजी दिलेल्या आदेशानुसार राज्य शासनाने दिनांक 26 नोव्हेंबर 2021 रोजी एक शासन निर्णय घेऊन या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईक रुपये पन्नास हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याची ही योजना दिनांक 1 डिसेंबर 2021 पासून ऑनलाईन पद्धतीने कार्यान्वित करण्यात आली आहे.
याच योजना संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी दिनांक 24 मार्च २०२२ रोजी दिलेल्या आदेशाला अनुसरून पुढील प्रमाणे आदेश राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात आले आहेत.
covid-19 या आजारामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या निकट नातेवाईकास पन्नास हजार इतके सानुग्रह सहाय्य देण्याचा योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत पुढीलप्रमाणे राहील.
covid-19 या आजारामुळे २०मार्च २०२२ पूर्वी मृत्यू झालेल्या झालेल्या असल्यास दिनांक २४ मार्च २०२२ पासून 60 दिवसाच्या आत म्हणजेच दिनांक 24 मे 2022 पर्यंत अर्ज करावा लागणार आहे.
तर covid-19 या आजारामुळे दिनांक २० मार्च २०२२ पासून पुढे मृत्यू झाल्यास मृत्युच्या दिनांकापासून ९० दिवसाच्या आत या योजनेखाली अर्ज करावा लागणार आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी वर नमूद केलेल्या मदतीच्या नंतरचे अर्ज केवळ ग्राहक निवारण समिती जी आर सी मार्फत करता येतील.
अर्ज करण्याची मुदत राज्यातील सर्व व्यक्तींना माहिती व्हावी याकरिता यापुढील प्रत्येक पंधरा दिवसाला एकदा याप्रमाणे सहा आठवड्याकरिता सर्व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रधानी करणारे प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे जाहीर प्रसिद्धी द्यावी अशे आदेश ही या निर्णयात देण्यात आले आहेत.
या योजनेकरिता ज्या अर्जदारांनी अनुग्रह साहाय्यासाठी चुकीचा दावा दाखल केलेला आहे त्यांच्याविरुद्ध जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 च्या कलम 52 प्रमाणे कारवाई करावी अशा आदेश देखील देण्यात आले आहेत.
वरील आदेश विचारता विचारात घेऊन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तातडीने कार्यवाही करावी अशी सूचना या शासन निर्णयातून देण्यात आली आहे.