आता गावठाण लगतच्या जमिनी NA करण्याची गरज नाही | Gaothan land NA

आता गावठाण लगतच्या जमिनी NA करण्याची गरज नाही.

Gaothan land NA 


राज्यातील शेतकरी वर्गाला दिलासा देण्याचा संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असे परिपत्रक 13 एप्रिल 2022 रोजी काढण्यात आलेले आहे, राज्यातील अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
गावठाण हद्दी पासून दोनशे मीटरच्या आतील ज्या जमिनी आहेत आशा जमीन मालकांना बिनशेती परवानगी (NA) घेण्याची आवश्यकता असणार नाही.



महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 42 ब क आणि ड हे कलम समाविष्ट केल्यानंतर NA करण्याच्या कार्यपद्धतीमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि याच बदलाच्या अनुषंगाने एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक राज्याचे महसूल विभागाचे सहसचिव रमेश चव्हाण यांच्या माध्यमातून काढून या सूचना सर्व तहसील कार्यालयांना देण्यात आलेले आहेत. 
त्याच्यामुळे गावठाण हद्दीपासून दोनशे मीटरच्या परिगय क्षेत्रांमध्ये रहिवासी वाणिज्यिक आणि औद्योगिक अशा प्रकारच्या वापरासाठी ज्या जमिनी शेती स्वरूपाच्या वापर करण्यासाठी जमिनी आहेत या जमिनीचे गटनंबर सर्वे नंबर दर्शवणारे याद्या तयार करून या याद्या मधील जमिनी, गट वर्ग एक आहे की वर्ग २ आहे असे वर्गीकरण करावे.

 भोगवटदार व क्षेत्रनिहाय जमिनीच्‍या रुपातंरणाबाबत देय असलेला रुपातंरीत कर व अकृषिक आकारणी  निश्‍चित करावी.
जमिनीचा धारणाधिकार वर्ग २ असल्‍यास नजराणा किंवा अधिमुल्‍य आणि इतर शासकिय देणी किती आहेत हे भोगवटदार निहाय निश्‍चीत करावे आणि धारणाधिकार वर्ग २ असलेल्‍या भोगवटदारास सदर जमिनीच्‍या वापराच्‍या परवानगीबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयास संपर्क करण्‍यास कळवावे व त्‍यानुसार अशा जमीनीच्‍या अकृषिक रुपातंरणाबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयाचे अभिप्राय प्राप्‍त करुन घ्‍यावे.
वर्ग एक च्या जमीन मालकांनी मात्र निश्चित केलेले कर उपकर भरल्यानंतर रीतसर सनद द्यावी अशा सूचना या परिपत्रकात देण्यात आल्या आहेत.

१८ मार्च २०१८ चा gr येथे पहा


अर्जाचे नमुने