वैरणीकरिता शेवगा लागवडीसाठी अनुदान
Shevga lagvad anudan yojana 2022
पशुपालकांनी व शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे पशुंसवर्धन विभागाचे आवाहन.
केंद्र पुरस्कृत सुधारित राष्ट्रीय पशुधन अभियान योजना राबवली जात आहे.
याच राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरणीसाठी शेवगा लागवड करणे (अनुसूचित जाती उपयोजना) या योजनेकरिता प्रती हेक्टरी 30 हजार रुपये प्रती लाभार्थी अनुदान दिले जाते.
या योनजेंतर्गत अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकरी, पशुपालकांना वैरणीकरिता शेवगा लागवड करण्यासाठी अनुदान वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी दिली आहे.
या योजनेंतर्गत प्रती हेक्टरी 7.5 किलो शेवगा (पीकेएम-1) बियाणाची किंमत रु. 6 हजार 750 व उर्वरित अनुदान रु. 23 हजार 250 हे दोन टप्प्यांमध्ये ( 11625 + 11625 ) वितरीत करण्यात येणार आहे.
यामध्ये
सेंद्रिय खते, रासायनिक खते यासाठी ५२५०/- रूपये
मशागत खर्च १२०००/- रुपये
इतर किरकोळ खर्च ६०००/- रुपये असणार आहे.
बीयाणाचा थेट पशुपालकांना पुरवठा करण्यात येणार असून, उर्वरित अनुदानातून जमिनीची मशागत व लागवड, खतांची खरेदी व इतर अनुषंगिक खर्च करावयाचा आहे.
या योजनेकरिता इच्छुक असणाऱ्या पशुपालक, शेतकरी यांनी जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालय, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती आणि नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्या करिता १० ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत.