सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे नागरिकांना आवाहन.
राज्य शासनाच्या माध्यमातून सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून, मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मात्र याला समाजात काही स्तरातून विरोध होत आहे तर काही स्तरातून स्वागत.
आणि सर्वाच्या पार्श्वभूमीवर सूपर मार्केट किंवा वॉक इन स्टोअरमध्ये कुलूपबंद कपाटामधून, मांडणी किंवा शेल्फद्वारे सीलबंद बाटलीमध्ये वाईन विक्री करण्यास परवानगी देण्याबाबत मसुदा तयार करण्यात आला आहे. या मसुद्यात सुधारणा करण्यासंदर्भात नागरिकांनी २९ जून 2022 पर्यंत हरकती किंवा सूचना पाठविण्याचे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त यांनी केले आहे.
या हरकती किंवा सूचना दि. २९ जून, २०२२ अखेरपर्यंत किंवा त्यापूर्वी आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई- ४०० ०२३ यांच्याकडे टपालाद्वारे अथवा dycomm-inspection@mah.gov.in या ई-मेल वर नोंदविण्यात याव्यात.
यासंदर्भातील अधिसूचनेचा मसूदा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे संकेतस्थळ http://stateexcise.maharashtra.gov.in येथे तसेच कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रकाशित करण्यात आली आहे.