तुमचं आधार कार्ड सुरक्षित, केंद्राचा निर्वाळा !
युआयडीएआय च्या बंगळुरू येथील प्रादेशिक कार्यालयाने 27 मे 2022 रोजी जारी केलेल्या केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने हे आहे.
सदर निवेदन आधार कार्डच्या फोटोशाॅपचा गैर वापर करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी जारी केल्याचे समजते. जनतेने आपल्या आधार कार्डची फोटो कॉपी कुठल्याही संस्थेबरोबर सामायिक करू नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो असे आवाहन या निवेदनात करण्यात आले होते. त्या ऐवजी आधार क्रमांकामधील केवळ शेवटचे चार आकडे दिसतील अशा प्रकारे तो झाकून त्यांची फोटोकॉपी वापरावी असे यात सूचित करण्यात आले होते.
तथापि, या निवेदनाचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता लक्षात घेता, हे निवेदन तात्काळ प्रभावाने मागे घेण्यात आले आहे.
आधार कार्ड धारकांनी आपला युआयडीएआय आधार क्रमांक सामायिक करताना सामान्य स्वरुपाची काळजी घ्यावी असे निवेदन युआयडीएआय ने जारी केले आहे.
आधार ओळख पडताळणी संरचनेने आधार कार्ड धारकाची ओळख आणि गोपनीयता जपण्यासाठी पुरेशी वैशिष्ट्ये प्रदान केल्याचे यात नमूद करण्यात आले आहे.