कापुस साठवणुक बॅग अनुदान आँनलाईन अर्ज सुरू | Cotton Storage Bag subsidy 2024

कापुस साठवणुक बॅग अनुदान आँनलाईन अर्ज सुरू  

Cotton Storage Bag subsidy 2024

राज्यपुरस्कृत एकात्मिक कापुस उत्पादकता वाढ व मुल्यसाखळी विकासासाठी विशेष कृती योजना सन 2022-23 ते 2024-25 या तीन वर्षात राबविण्यात येत आहे. सदर योजनेंतर्गत कापुस साठवणुक बॅग शेतक-यांना वाटप करण्यात येणार असुन कापुस साठवणुक बॅग या घटकासाठी शेतक-यांना महाडीबीटी प्रणालीवर 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज सादर करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी अनिल गवळी यांनी केले आहे. 

त्याअनुषंगाने सदर घटकाच्या लाभार्थी निवडीकरीता पुढीलप्रमाणे कार्यपध्दती राबविण्यात येईल. सदर योजनेंतर्गत कापुस साठवणुक बॅगचा लाभ प्रति लाभार्थि 1 हेक्टरच्या मर्यादेत द्यावयाचा आहे. याकरीता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करताना क्षेत्र 0.10 हे. ते 0.40 हे. 3 कापुस साठवणुक बॅग, क्षेत्र 0.41 हे. ते 0.80 हे. 6 कापुस साठवणुक बॅग,  क्षेत्र 0.81 हे. ते 1.00 हे. 8 कापुस साठवणुक बॅग याप्रमाणे मॅट्रीक्स देण्यात आले आहे.  

तरी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्या शेतक-यांना कापुस साठवणुक बॅग सर्वसाधारणपणे हेक्टरी 8 बॅग प्रमाणे द्यावयाचे असल्याने 12.50 गुंठे किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रासाठी 1 कापुस साठवणुक बॅग, 12.51 गुंठे ते 25.00 गुंठे क्षेत्रासाठी 2 कापुस साठवणुक बॅग, 25.01 गुंठे ते 37.50 गुंठे क्षेत्रासाठी 3 कापुस साठवणुक बॅग, 37.50 गुंठे ते 50.00 गुंठे क्षेत्रासाठी 4 कापुस साठवणुक बॅग, 50.01 गुंठे ते 62.50 गुंठे क्षेत्रासाठी 5 कापुस साठवणुक बॅग, 62.51 गुंठे ते 75.00 गुंठे क्षेत्रासाठी 6 कापुस साठवणुक बॅग, 75.01 गुंठे ते 87.50 गुंठे क्षेत्रासाठी 7 कापुस साठवणुक बॅग, 87.51 गुंठे ते 100 गुंठे क्षेत्रासाठी 8 कापुस साठवणुक बॅग याप्रमाणे कापुस साठवणुक बॅग प्रत्यक्षात वाटप करण्यात येणार आहे.



या योजनेंतर्गत कापुस साठवणुक बॅग घटकास इच्छुक शेतक-यांना महाडीबीटी प्रणालीवर अर्ज करण्यात यावेत.  सदर योजनेंतर्गत महाडीबीटी प्रणालीव्दारे शेतक-यांना मुख्य Tile Seed/Chemical/ Fertilizer →Storage Facility या उपघटकांतर्गत कापुस साठवणुक बॅग या घटकासाठी दि. 31 ऑगस्ट, 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत व या योजनेचा लाभ घ्यावा, असे श्री. गवळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.