१००% अनुदानावर शेळी गट वाटप, या जिल्ह्याचे अर्ज सुरू
Sheli gat vatap yojana 2022
जिल्हास्तरीय अनु.जाती उपयोजना अंतर्गत १०+१ बोकड गट पुरवठा करणे, अनु. जाती/नवबौध्द लाभार्थींना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणेसाठी अर्ज मागणी , नाविन्यपूर्ण योजना विधवा महिलांना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळीगट वाटप करणे व नाविन्यपूर्ण योजना दिंव्यंगाच्या कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर शेळीगट वाटप करणे लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग उस्मानाबाद यांच्या माध्यमातून या चार महत्त्वपूर्ण संशोधन करता अर्ज मागवण्यात आले आहेत आता याच्या मधील पहिली योजना असणारे अनुसूचित जाती नवबौद्ध लाभार्थ्यांना पशुसंवर्धन विषयक प्रशिक्षण देणा-या त्यामध्ये प्रति तालुका व्हात इस प्रशिक्षणार्थी असे एकूण उस्मानाबाद जिल्ह्यातील 240 प्रशिक्षणार्थ्यांना प्रति प्रशिक्षणार्थी १००० रुपये खर्च मर्यादेमध्ये प्रशिक्षण तीन दिवसासाठी दिला जाणार आहे त्याच्यामध्ये 30 टक्के महिला आणि ५ टक्के दिव्यांगासाठी आरक्षण ठेवण्यात आलेला आहे.
अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज पशुवैद्यकीय दवाखान्यात सादर करायचे ज्याच्यासाठी अर्जासोबत जातीचा दाखला ग्रामपंचायत शिफारस पत्र साक्षांकित फोटो आणि आधार कार्ड हे सादर करणे आवश्यक आहे.
दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी वैरण विकास कार्यक्रम अंतर्गत सर्व जाती प्रवर्गातील ओबीसी एससी एसटी ओपन प्रवर्गातील लाभार्थ्यांना शंभर टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी वैरण विकास कार्यक्रमाच्या अंतर्गत वैरण बियाण्याचे वाटप करण्यासाठी पंधराशे रुपये मर्यादेमध्ये 3333 लाभार्थ्यांना हे वाटप केले जाणार आहे त्याच्यासाठी जिल्ह्यातील अल्प अत्यल्प भूधारक शेतकरी लाभार्थ्यांकडून तीन ते चार जण असतील असे लाभार्थी या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या अशा लाभार्थ्यांना आपला अर्ज हा पशुवैद्यकीय दवाखाना मध्ये सादर करायचा आहे.
नाविण्यपूर्ण योजनेअंतर्गत विधवा महिलांना शंभर टक्के अनुदानावर 32 शेळी गट वाटप करणार याच्यामध्ये पण जर पाहिलं तर जिल्ह्यातील विधवा महिला लाभार्थ्यांना 100 टक्के अनुदानावर ते दोन शेळी गट वाटप केले जाणार आहे त्याच्यामध्ये प्रति लाभार्थी दोन शेळी ची किंमत असणारे सोळा हजार रुपये आणि तीन वर्षाचा विमा एक हजार रुपये प्रति लाभार्थी 17012 रुपये एवढे याठिकाणी किंमत एवढा खर्च अनुदान दिले जाणार आहे.
सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील जनरल एससी एसटी ओपन सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना देण्यात येईल एका विधवा महिलेला दोन उस्मानाबाद शेळीचा वाटप करण्यात येणार आहे.
नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत दिव्यांगाच्या कुटुंबांना 100 टक्के अनुदानावर 2 शेळी गट वाटप करणे.
जिल्ह्यातील दिव्यांगाच्या कुटुंबांना 100 % अनुदानावर दोन शेळी गट वाटप केले जाणार आहे याच्यासाठी सुद्धा 17012 रुपये एवढे अनुदान या ठिकाणी दिला जाणार आहे सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील जनरल एससी एसटी ओबीसी प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे एका दिव्यांग लाभार्थीला दोन उस्मानाबाद शेळीचा वाटप करण्यात येईल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज कागदपत्र जोडून पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडे सादर करायचे आहेत. जे अर्ज 27 जून २०२२ पासून स्वीकारण्यासाठी सुरूवात होणार आहेत.