शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज सुरू | Samaj kalyan hostel Admission 2022

सन 2022-23 साठी शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन.

Samaj kalyan hostel Admission 

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये मुलांची व मुलींचे शासकीय वसतिगृहे कार्यरत आहेत. 

या वसतिगृहांची प्रवेश प्रक्रिया यावर्षी ऑनलाईन पध्दतीने होणार असून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी http://www.hostel.mahasamajkalyan.in हे संकेतस्थळ देण्यात आले आहे. 

या लिंकचा वापर करुन विद्यार्थी प्रवेशाचे वेळापत्रक,रिक्त जागेचा तपशिल,प्रवेशासाठी नियम,अटी व शर्ती यांची माहिती घेवून अर्ज भरु शकतात.  प्रवेश अर्ज भरण्याकरिता जिल्ह्यात इ.आठवी व आकरावी मध्ये शिक्षण घेणाऱ्या व पदवी,पदविका प्रथम वर्षात,पदव्युत्तर प्रथम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेशासाठी अर्ज भरता येईल.

या शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी उपरोक्त लिंक चा वापर करुन तसेच स्थानिक गृहप्रमुख / गृहपाल यांच्याकडे संपर्क साधुन प्रवेश अर्ज भरावेत असे  आवाहन आयुक्त समाज कल्याण यांनी केले आहे.


ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यासाठी Google Chrome च्या लेटेस्ट व्हर्जनचाच वापर करावा, वरील लिंक Google वर ओपन होत नसल्यास सदर लिंक ब्राउझरच्या URL बारमध्ये टाइप करुन  घ्यावी. 

ज्या विद्यार्थ्यांची मागील वर्षाचे गुण ग्रेड सिस्टीममध्ये असतील त्यांनी संबंधीत शाळा/महाविद्यालयाकडून ग्रेड मधील गूण अंकामध्ये करुन घ्यावे व त्यानंतरच ऑनलाईन अर्ज भरावा.