सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू | Assk registration 2023

 सुरू करा आपले सरकार सेवा केंद्र, या जिल्ह्याचे अर्ज सुरू

  Assk registration 2023

Aple sarkar seva kendra


नागरिकांना सेवा सोबत तरुणांना रोजगाराचा एक नवा पर्याय देखील उपलब्ध होतो.

‘आपले सरकार सेवा केंद्र’ करिता अर्ज मागविले


अकोला जिल्ह्यातील महापालिका, नगरपरिषद, मगरपंचायत ,ग्रामपंचायत क्षेत्रात ‘आपले सरकार सेवा केंद्र’ करिता इच्छुक सेवा केंद्र, स्थानिक केंद्रधारकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

इच्छुक अर्जदारांनी दि.२० पर्यंत आपले अर्ज ऑनलाईन सादर करावे,असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

इच्छुक अर्जदारांनी दि.८ ते २० दरम्यान  जिल्हाधिकारी कार्यालयाचे संकेतस्थळ www.akola.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज डाऊनलोड करावा. 

जिल्हाधिकारी कार्यालय अकोला – अकोला जिल्यातील १७० आपले सरकार सेवा केंद्र करिता मान्यता द्यावयाची आहे त्या करीत CSC व स्थानिक केंद्र चालकांकडून अर्ज मागवण्याबाबत

अर्ज करण्यासाठी येथे 

जिल्हा सुचना विज्ञान केंद्रास कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत  दि.२० पर्यंत सादर करावा. 

त्यानंतर प्राप्त अर्जांचा विचार होणार नाही.

यापूर्वी ज्यांनी आधार सेवा केंद्र मिळण्यासाठीअर्ज केले असतील त्यांनीही  पुन्हा अर्ज करावे. यासंदर्भातील सर्व अटीशर्ती संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. 

जे अर्जदार पात्र ठरतील त्यांनी अर्ज भरतेवेळी ज्या भागात केंद्र मागितले असेल तेथेच केंद्र सुरु करणे बंधनकारक असेल. ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर सर्व अनुषंगिक कागदपत्रे  अर्ज स्विकृती केंद्रात भरलेल्या अर्जासोबत जमा करावे. 

पात्र अपात्र उमेदवारांची सर्व माहिती www.akola.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल. 

संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या जागांमध्ये वा वेळापत्रकांमध्ये बदल करण्याचे संपूर्ण अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समिती अध्यक्ष यांचेकडे राखीव आहेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. तरी इच्छुकांनी अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र शासनाच्य माहिती व तंत्रज्ञान विभाग व सामन्य प्रशासन विभागाच्या वतीने शासन निर्णयाअन्वये केंद्रशासनाच्या राष्ट्रीय ई- गव्हर्नन्स कृती कार्यक्रमांतर्गत राज्यातील ग्रामीण व शहरी भागात नागरिकापर्यंत शासकीय, निमशासकीय व खाजगी सेवा पोहचविण्यासाठी शासनाच्या वतीने आपले सरकार सेवा केंद्रे हे प्रत्येक ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात नगरपंचायत कार्यक्षेत्रात नगर परिषद कार्यक्षेत्रात व तसेच महानगर पालिका कार्यक्षेत्रात आपले सरकार सेवा केंद्रे स्थापीत करणे बाबतचा उक्त शासन निर्णयाव्दारे निर्णय घेण्यात आलेला आहे.

आपले सरकार सेवा केंद्रासाठी अटी व शर्ती पूढील प्रमाणे आहेत.- आपले सरकार सेवा केंद्रामार्फत महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 19 जानेवारी 2018 मधील परीशिष्ट क मध्ये नमुद केलेल्या सर्व सेवा नागरीकांना देणे आवश्यक आहे. या शासन निर्णयातील परीशिष्ट ड मध्ये नमुद केलेल्या विहीत नमुन्याप्रमाणे आपले सरकार सेवाकेद्राचा बोर्ड / फलक लावणे आवश्यक आहे. 

आपले सरकार सेवा केंद्र मंजूर ठिकाणीच चालविण्यात यावे अन्यथा इतर ठिकाणी आढळून आल्यास त्यांचेवर कार्यवाही करण्यात येईल. नागरीकांकडून स्वकारण्यात येणाऱ्या पेमेंटसाठी ई-सुविधा उपलब्ध् करुन दयाव्यात, डिजिटल पेमेंटला प्राधान्य देणे. शासनाने ठरवुन दिलेल्या वेळापत्रकानुसार आपले सरकार सेवा केद्र चालु ठेवुन नागरीकांना सेवा पुरविणे.

शासनाने ठरवून दिलेल्या कॉमन ब्रॅडींगचा वापर करणे तसेच महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाने स्थापन केलेल्या हेल्पलाईन क्रमांकाचा तपशील आपले सरकार सेवा केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे. 

शासनाने ठरवून दिलेले दर केंद्राच्या दर्शनी भागावर प्रसिध्द करणे तसेच ठरवुन दिलेल्या दरापेक्षा अधिक शुल्काची आकारणी न करणे. 

शासनाने पुरविलेल्या वस्तू आज्ञावली इ. चे वापर संरक्षण जतन करणे. सर्व ग्राहकांना सौजन्याची वागणुक देणे आणि आवश्यक मदत व सहकार्य करणे. 

विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत ठरवुन दिलेले वेळापत्रक व निर्देश काटेकारेपणे पाळणे. 

ज्या अर्जदारांकडे CSC ID नाहीत अशा अर्जदारांनी CSC ID काढणे आवश्यक आहे.

आपले सरकार सेवा केद्र स्थापन करण्यासाठी संबंधित गावातील इच्छुक अर्जदाराने विहीत नमुन्यातील अर्ज  जिल्हाधिकारी कार्यालयास करु शकतात.