प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभासाठी बँक खाती आधार संलग्न करण्याचे आवाहन
pm kisan yojana
केंद्र शासनाने माहे डिसेंबर-मार्च 2022 या कालावधीतील 13 व्या हप्त्याचे वितरणाचे नियोजन करण्यासाठी आयोजित केलेल्या दि. 2 डिसेंबर, 2022 च्या दूरचित्रवाणी परिषदेमध्ये सर्व लाभार्थ्यांची बँक खाती दि. 15 डिसेंबर, 2022 पर्यंत आधार संलग्न करण्याचे निर्देश दिले होते.
केंद्र शासनाच्या पत्रातील निर्देशाप्रमाणे प्रधानमंत्री किसान योजनेतील लाभार्थीची बँक खाती दि. 15 जुलै, 2022 पर्यंत आधार संलग्न करण्यासाठी कृषि आयुक्तालयाने सूचित केले आहे. तथापि, राज्यातील एकूण 100.29 लाख आधार प्रमाणिकृत लाभार्थीपैकी 14.88 लाख लाभार्थींची बँक खाती अद्यापही आधार संलग्न करणे प्रलंबित आहेत.
केंद्र शासनाकडून दर शुक्रवारी या अनुषंगाने आढावा घेतला जात असून 13 वा हप्ता वितरणापूर्वी लाभार्थीची बँक खाती आधार संलग्न करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आधार संलग्न केलेल्याच बँक खात्यामध्ये यापुढील लाभ वितरीत केला जाणार आहे. यासाठी लाभार्थ्यांनी व्यक्तीश: संबंधित बँकेत जाऊन स्वत:चे बँक खाते आधार संलग्न करुन घ्यावेत.
जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रधानमंत्री किसान लाभार्थीची बँक खाती मोहिमेच्या स्वरुपात आधार संलग्न करण्यासाठी आपल्या स्तरावरुन आदेश निर्गमित करण्याच्या सूचना जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकाला निर्देश देण्यात आले आहे. तसेच तलाठी, कृषि सहायक व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून लाभार्थींना संपर्क करुन त्यांची बँक खाती आधार संलग्न करण्यात यावीत.
पी.एम. किसान योजनेच्या यापुढील लाभ मिळण्यासाठी बँक खाती आधार संलग्न असल्याचे बंधनकारक असल्याची जनजागृती आकाशवाणी, दूरदरर्शन, इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाद्वारे करण्यात यावी. बँक खाती आधार संलग्न करण्यास प्रलंबित असलेल्या लाभार्थीच्या याद्या ई-मेलवर पाठविण्यात येत असून त्या सर्व संबंधितांना तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात.
तसेच सोबत पीएफएमएसने लाभ अदायगीसाठी नाकारलेल्या लाभार्थींची संबंधितांना तात्काळ उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच पीएफएमएसने लाभ अदायगीसाठी नाकारलेल्या लाभार्थींची यादी पाठविली आहे. या यादीतील लाभार्थीची बँक खाती आधार प्रमाणिकृत करण्यासाठी यथोचित दुरुस्ती करण्यात यावी, असे निर्देशही दिले आहेत.