अखेर प्रतीक्षा संपली !
नियमित पीक कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचे व्याज येणार खात्यात, शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय
Binvyaji karj
राज्यातील शेतकरी विविध बँकांच्या माध्यमातून पीक कर्ज घेतात. यापैकी जे शेतकरी नियमितपणे पिक कर्जाचे परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून विविध प्रकारचे लाभ देण्यात येतात.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत ( Binvyaji karj yojana ) योजनेचा लाभ देखील अशा नियमित पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना दिला जातो.
ताच व्याज सवलत योजनेच्या संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, ज्यामुळे व्याजमाफी च्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
शासन निर्णय खालील लिंक वर पहा
📄👇
सन 2022-23 मधील अर्थसंकल्पित तरतूदीचे वितरण करणेबाबत- डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना
राज्य शासनाच्या माध्यमातून आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याज पूर्णपणे माफ केले जाते. याकरिता राज्यात डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना राबवली जाते.
या योजनेच्या अंतर्गत एक लाख रुपयांपर्यंतचे संपूर्ण व्याज राज्य शासनाच्या माध्यमातून दिले जाते. तसेच एक लाखापासून ते तीन लाखापर्यंत तीन टक्के व्याज राज्य शासनाच्या आणि तीन टक्के व्याज केंद्र सरकारच्या माध्यमातून माफ केले जाते.
डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजना या योजनेच्या अंतर्गत 2022-23 मध्ये नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात सवलत देण्यासाठी शासनाने ₹ 232 कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे.
तरतूद केलेल्या या निधीपैकी या अगोदर 48.72 कोटी,32.48 कोटी आणि 16.24 कोटी अशाप्रकारे वितरण करण्यात आलेले आहे.
या योजनेच्या अंतर्गत वितरित करण्यासाठी उपयुक्त असलेला 118.32 कोटी रुपयाचा निधी वितरित करण्यासाठी 24 मार्च 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे.
बरेचशे नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी व्याजमाफीच्या प्रतीक्षात होते. आता या 118.32 कोटी निधीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यात आता या व्याज सवलतीची रक्कम जमा होणार आहे.
पिक कर्ज परतफेड विहित मुदतीमध्ये म्हणजे 30 जून पर्यंत करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंतचे पिक कर्ज हे बिनव्याजी दिले जाते.