पशुसंवर्धन विभागात मोठी भरती; अर्ज प्रक्रिया सुरु
AHD maharashtra reqruietment 2023
पशुसंवर्धन विभागात विविध ४४६ पदांसाठी भरतीची प्रक्रिया राबविली जात आहे.
लम्पी संसर्गाच्या वेळी पशुसंवर्धन विभागात पदांची कमतरता लक्षात घेता, ही पशुसंवर्धन विभागाची पदभरती जाहीर केली आहे.
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविली जात आहे.
याच अंतर्गत पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून सरळसेवा कोटयातील रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात काढण्यात आली आहे.
यामध्ये पशुधन पर्यवेक्षकची ३७६ पदे, वरिष्ठ लिपीकची ४४ पदे, लघुलेखक (उच्चश्रेणी)ची ०२ पदे, लघुलेखक (निम्नश्रेणी) ची १३ पदे, प्रयोगशाळा तंत्रज्ञची ०४ पदे, तारतंत्रीची 03 पदे, यांत्रिकीची ०२, पदे, बाष्पक परिचरची ०२ पदे अशी एकूण ४४६ पदे भरली जाणार आहेत.
⇒ फी: खुला प्रवर्ग: ₹1000/- , मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक: ₹900/-.
⇒ वयोमर्यादा: सर्वसाधारण प्रवर्ग 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ 18 ते 43 वर्षे (दिव्यांग 08 वर्षे, मा. सैनिक – सैनिकि सेवा अधिक 03 वर्ष, अंशकालीन उमेदवार 55 वर्षापर्यंत वयामध्ये सवलत)
यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
For Application Click here - https://ibpsonline.ibps.in/cahmay23/
२७.०५.२०२३ रोजी सकाळी १०.०० वा. पासुन अर्ज प्रक्रिया सुरु होणार आहे, तर ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक ११.०६.२०२३ रात्री ११. ५९ वाजेपर्यंत आहे. तसेच यांची परीक्षा येत्या जुलै महिन्यात होणार आहे.