नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू ! | Fair price shop license application

नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज सुरू

Manifesto Approval of fair price shops 

सातारा जिल्ह्यात अर्ज मागविले.


महाराष्ट्र शासनाचे रास्तभाव / शिधावाटप दुकाने व केरोसीन परवाने मंजूर करणेबाबत  शासन निर्णयानुसार सध्याचे रास्तभाव दुकान परवाने तसेच ठेवून आजमितीस रद्द असलेले व यापुढे रद्द होणारे, राजीनामा दिलेले व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाचे तसेच विविध कारणांमुळे भविष्यात द्यावयाचे रास्तभाव दुकाने मंजूर करावयाचे आहेत.

सातारा जिल्हयातील कार्डधारकांची होणारी गैरसोय दूर करण्याकरीता सध्याची रास्त भाव दुकाने कायम ठेवून आजमितीस रद्द असलेली, राजीनामा दिलेली, व लोकसंख्या वाढीमुळे द्यावयाची नवीन रास्त भाव दुकाने प्राधान्यक्रमानुसार सातारा जिल्हयातील शहरी व ग्रामीण भागाकरीता मंजुर करण्याच्या अनुषंगाने दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी जाहीरनामा प्रसिध्द करणेत येत आहे तरी, कागदपत्रासह तहसिलदार यांच्याकडे अर्ज करावेत.

यामध्ये, सातारा तालुका - गावे 12 व शहरी भागातील ठिकाण -01, वाई तालुका – गावे 17 व शहरी भागातील ठिकाण 01 तसेच  कराड तालुका गावे- 07 ,  महाबळेश्वर तालुका-45,  खंडाळा तालुका -08, कोरेगाव तालुका -13,  खटाव तालुका-07,  फलटण तालुका - 05 अशा एकूण-116 गावे / ठिकाणांचा समावेश आहे. 

याकरीता संबंधित तालुक्यांचे तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करणेचा कालावधी दि.1 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 अखेर ( सुट्टीचे दिवस सोडून) असा निश्चीत करणेत आला आहे. तरी ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था, नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था महिलांच्या स्वयंसहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राथम्यक्रमानुसार नवीन रास्त भाव दुकानाकरीता ज्यांना अर्ज करणेचे असतील, त्यांनी संबंधित तहसिल कार्यालय, पुरवठा शाखा यांचेकडे संपर्क साधावा व विहीत मुदतीत आवश्यक त्या कागदपत्रांसह तहसिलदार यांचेकडे अर्ज सादर करावेत. 

मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही असे आवाहन मा.जिल्हाधिकारी, यांचे मार्गदर्शनाखाली वैशाली राजमाने, जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

दुकान निवडी साठी प्राधान्यक्रम


१ पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था)

२. नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट,

३. महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, ४. संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास

५. महिला स्वयंसहायता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था

संबंधीतांनी अर्ज केल्यानंतर प्राधान्यक्रमानुसार रास्तभाव दुकान परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायाव्दारे करणे आवश्यक राहील. प्राधान्य सूचीनुसार पंचायत / संस्था/ गटांची निवड करताना जेष्ठ, वर्धनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या व अंतर्गत व्यवहार पारदर्शक व परतफेड चोख व नियमित असलेल्या व प्रतिवर्षी लेखापरिक्षण केलेल्या पंचायत / संस्था/गटास प्राधान्य देण्यात येईल.

नविन स्वस्तधान्य दुकान मिळणेकामी अर्ज केलेल्या पंचायत / संस्था/ गटांची आर्थिक स्थिती ही किमान ३ महिन्याचे धान्य उचलण्या इतकी सक्षम असावी.

अर्ज करताना अर्जासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.


१. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था) यांचेसाठी ग्रामसभेचा ठराव, ग्रामपंचायतचा दुकान मागणी अर्ज, तेरीज पत्रक, ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेबाबत गटविकास अधिकारी यांचा दाखला.

२. पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्यसंस्था), नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गट, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० अंतर्गत नोंदणीकृत सहकारी संस्था, संस्था नोंदणी अधिनियम अंतर्गत नोंदणी झालेल्या सार्वजनिक संस्था किंवा सार्वजनिक न्यास यांचे नोंदणी प्रमाणपत्र.

३. पंचायत / स्वयंसहायता गट/संस्था/ सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे आर्थिक स्थितीबाबत कागदपत्र जसे बँक पासबुकची छायांकित प्रत व बँकेचे प्रमाणपत्र / बँक स्टेटमेंट.

४. व्यवसाय करावयाच्या जागेचे मालकीबाबत कागदपत्र, जागा भाड्याची असल्यास भाडेपत्र, घर, टॅक्स पावती, ७/२, जागेचे क्षेत्रफळ, व्यवसाय ठिकाणाचे क्षेत्रफळ चौ. फुटमध्ये.


५. बँकेकडून कर्ज घेतले असल्यास कर्जाचा तपशील व परतफेडीचे प्रमाणपत्र (बँकेचे) व कर्जाची नियमित परतफेड चालू असलेबाबत संबंधीत बँकेचे प्रमाणपत्र व कर्जाची परतफेड झाली असल्यास संबंधीत बँकेचे कर्ज पूर्ण फेड केल्याबाबतचे प्रमाणपत्र.

६. पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास यांचे वार्षिक लेखे व हिशोब सन २०१८-१९ पासून आजपर्यंत तपासणी केलेल्या संस्थेचा अहवाल. ७. पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे अध्यक्ष/उपाध्यक्ष / सचिव व सर्व सभासदांची नावे, पूर्ण पत्यासह.

८. पंचायत / स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था/ न्यास यांचे मूळ व आजचे भागभांडवल व सध्या करीत असलेले व्यवसाय व कार्याची संपूर्ण माहिती. ९. रास्तभाव दुकान परवाना मिळण्याबाबत व व्यवसाय करण्यासाठी संमती दर्शविलेला पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास यांचा ठराव.


१०.पंचायत /स्वयंसहायता गट /संस्था/ सार्वजनिक संस्था / न्यास स्वस्त धान्य दुकान स्वतः एकत्रितरित्या चालवतील, कोणीही इतर व्यक्तीस अथवा संस्थेस चालविण्यास देणार नाही किंवा हस्तांतरीत करणार नाही याबाबत प्रतिज्ञापत्र.

११. भाडे तत्वावर दिल्या गेलेल्या जागेसंबंधी मूळ जागा मालकाचे विधीग्राह्य दस्तऐवज.

१२. पंचायत / स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे नावे अन्य कोठेही शिधावाटप दुकान कार्यान्वित नसल्याचे रु.१००/- च्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र. (सदरची माहिती खोटी असल्याचे भविष्यात निदर्शनास आल्यास नियमाप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल)

१३. पंचायत /स्वयंसहायता गट / संस्था / सार्वजनिक संस्था / न्यास यांचे सदस्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याबाबत रु.१००/- च्या स्टँपपेपरवर प्रतिज्ञापत्र.

१४. स्वयंसहायता गटाचे सभासद दारिद्य रेषेखालील असल्यास शिधापत्रिका / ग्रामसेवकांचे पत्र / नगरपालिकेकडील पत्र .

जिल्हा ग्रामीणमधील स्वस्त धान्य दुकान परवाने मंजूरीसाठी खाली नमूद तालुकानिहाय गावी /ठिकाणी नवीन रास्तभाव दुकान देणेकामी जाहीरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे.

Old Update 

👇

यासाठी नंदुरबार जील्ह्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

रिक्त ठिकाणांसाठी अर्ज संबंधीत तहसिल कार्यालयाचे पुरवठा शाखेमध्ये रु.१०/- शासनजमा करुन घेऊन उपलब्ध होतील. सदरचे अर्ज दिनांक 03.07.2023  ते दिनांक 03.08.2023  पर्यंत कार्यालयीन वेळेत (शासकीय सुट्टी वगळून) संबंधीत तहसिल कार्यालयाचे पुरवठा शाखेमध्ये स्विकारण्यात येतील.

उपरोक्त नमूद शासन निर्णयानुसार इच्छूक पंचायत/संस्था/गट यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधीत तहसील कार्यालयाकडे मुदतीत अर्ज सादर करावेत. 

PDF link

मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.

ration



वाशिम जिल्हयात रिक्त असलेल्या रास्त भाव दुकाने परवाना मंजूरीकरीता संबंधित गावात जाहिरनामा प्रसिध्द करण्यात येत आहे. जिल्हयातील 28 गावात रिक्त असलेल्या ठिकाणी रास्त भाव दुकाने सुरु करण्याकरीता 20 जुलै ते 5 ऑगस्ट 2023 या कालावधीत इच्छुकांकडून संबंधित तहसिल कार्यालयामार्फत विहीत नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहे.

रिक्त असलेल्या रास्त भाव दुकाने तालुका व गाव/ वार्डनिहाय पुढील प्रमाणे. वाशिम तालुका- काटा भाग-2, कानडी, कामठवाडा, घोटा, धारकाटा व कुंभारखेडा. 

मालेगांव तालुका- मालेगाव शहर (गांधीनगर), पांगरखेड, वरदरी (खु.), कुरळा व झोडगा (खु.). रिसोड तालुका- कोयाळी खु. (केनवड) व तपोवन. 

मंगरुळपीर तालुका- एकांबा व स्वाशिन, 

कारंजा तालुका- कारंजा वार्ड क्र. 21, कारंजा वार्ड क्र. 4, वढवी, वडगांव (रंगे), पिंपळगांव (खु).  व धोत्रा जहाँगीर. 

मानोरा तालुका- जामदरा घोटी, पाळोदी भाग- 1, आसोला (खु.), बोरव्हा, चाकुर, वार्डा व जवळा (खु.) अशा एकूण 28 गावात व वार्डात रिक्त असलेल्या रास्त भाव दुकानाकरीता अर्ज मागविण्यात येत आहे.

28 नवीन रास्त भाव दुकान परवाने हे खालील प्राधान्य क्रमानुसार मंजूर करण्यात येणार आहे. यामध्ये पंचायत (ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था), नोंदणीकृत स्वयं सहाय्यता बचतगट, नोंदणीकृत सहकारी संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था व महिला स्वयं सहाय्यता बचतगट व महिलांच्या सहकारी संस्था यांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी तेजश्री कोरे यांनी दिली.