पीक विमा भरण्यास मुदतवाढ, आता 31 July पर्यंत पीक विमा भरता येणार
PMFBY crop insurance date extended
पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता, पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आता आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून 31 जुलै पर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
महाराष्ट्रात खरीप 2024 साठी PMFBY नावनोंदणीची अंतिम तारीख 15 जुलै 2024 आहे. खरीप हंगामातील सामान्य पेरणी क्षेत्र 142 लाख हेक्टर आहे. 12 जुलै 2024 पर्यंत नावनोंदणी 1.10 कोटी आहे आणि विमा उतरवलेले क्षेत्र 72 लाख हेक्टर (सामान्य पेरणी क्षेत्राच्या 50%) आहे. गेल्या वर्षी नावनोंदणी 1.70 कोटी होती आणि विमा उतरवलेले क्षेत्र 113 लाख हेक्टर (सामान्य पेरणी क्षेत्राच्या 80%) होते. गेल्या वर्षी नावनोंदणीची कटऑफ तारीख 31 जुलै 2023 होती.
यावर्षी जून-जुलैमध्ये झालेल्या चांगल्या पावसामुळे, शेतकरी पेरणीच्या कामात सतत व्यस्त आहेत, ग्रामीण भागात इंटरनेट कनेक्टिव्हिटी खराब असल्याने खूप शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित आहेत.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी एक रुपयात पीक विमा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी 15 जुलै पर्यंत मुदत देण्यात आली होती.
आजपर्यंत राज्यात लाखो शेतकऱ्यांनी एक रुपयात आपला विमा अर्ज नोंदवून सहभाग घेतला आहे. मागील मात्र काही ठिकाणी सर्व्हर डाऊन होणे व तत्सम तांत्रिक अडचणी येत असल्याचा तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.
त्यानुसार शेतकरी कोणत्याही तांत्रिक बाबींमुळे विमा भरण्यापासून वंचित राहू नये, यादृष्टीने 31 जुलै पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी विहित वेळेत आपले विमा अर्ज नोंदवून घ्यावेत, असे आवाहन कृषिमंत्री श्री. मुंडे यांनी केले आहे.