कृषी औजारासाठी पंचायत समितीमध्ये 30 नोव्हेंबरपर्यत अर्ज | zp scheme jalana 2023

कृषी औजारासाठी पंचायत समितीमध्ये 30 नोव्हेंबरपर्यत अर्ज 

Zp scheme jalana 2023

जालना जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत जिल्हा परिषद उपकर योजना सन 2023-24 अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर कृषी औजारे पुरविण्यात येणार आहेत. 

तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी औजारे मागणीसाठी संबंधित पंचायत समितीमध्ये दि.30 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑफलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना व अतिरिक्त मुख्य  कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी केले आहे.



कृषी औजारामध्ये एच.पी.ओपनवेल सबमर्सिबल विद्युत पंपसंच, कडबाकुटी विना विद्युत मोटार, ट्रॅक्टर चलित औजारात पल्टीनांगर व पेरणी यंत्र, ब्लोअर, रोटाव्हेटर आणि ट्रॅक्टर यांचा समावेश आहे. 

शेतकऱ्यांनी लाभ घेण्यासाठी स्वत:च्या नावे सातबारा व वार्षिक उत्पन्न 1 लाख 50 हजार रुपयांपर्यत असावे. असे कृषी विकास अधिकारी, जि.प. जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.