रब्बी पिक विमा साठी निधी वितरित
Rabbi pik vima
राज्यात शेतकऱ्यांच्या पिकांना होणाऱ्या विविध प्रकारच्या हवामान धोक्या मूळे शेतकऱ्यांचे नुकसान होते आणि याच धोक्यापासून आर्थिक नुकसान टाळून शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्यासाठी राज्यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येते.
२०२१ मध्ये अतिवृष्टी गारपीट यामुळे शेती पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे,
या नुकसानीच्या भरपाई साठी अनेक शेतकऱ्यांनी क्लेम देखील केलेले आहेत. हे नुकसान भरपाई चे दावे निकाली काढण्यासाठी देखील विमा कंपनीला निधी असलेली गरज व विमा कंपनीची मागणी विचारात घेता सन २०२१ च्या खरीप पीक विमा योजनेसाठी निधी वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पूरक अनुदान या योजनेअंतर्गत रु. 62,97,895/- इतकी रक्कम विमा कंपनीस वितरीत करण्यासाठी मंजूरी देण्याबाबत
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202302231139286601.pdf
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202302231145371301.pdf
रब्बी हंगाम २०२१ साठी या शासन निर्णयानवये ₹१८७.१५ कोटी एवढा निधी वितरीत करण्यास मंजूरी दिली आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2020 व रब्बी हंगाम 2020 21 पासून तीन वर्षाकरिता दिनांक 29 6 2020 व दि. 2020 च्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषी विमा कंपनी, इफ्को टोकियो जनरल इन्शुरन्स कं. लि., बजाज एलियन्स इन्शुरन्स कंपनी लि. व एचडीएफसी इग्रो इन्शुरन्स कं.लि या ६ विमा कंपन्या मार्फत राबविण्यात येत आहे.
भारतीय कृषी विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे भारतीय कृषी विमा कंपनी चे प्रधानमंत्री पिक विमा योजना रब्बी हंगाम 2021 22 अंतर्गत उपरोक्त ६ कंपन्यांचा एकत्रित मिळून पीक विमा हप्ता अनुदानापोटी राज्य शासन हिस्सा अनुदानाची मागणी केलेली आहे.
केंद्र शासनाच्या सुधारित मार्गदर्शक सूचनामधील मुद्दा क्र १३.१.११ नुसार, प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगाम २०२१-२२ ची राज्य हिसायची रक्कम दिनांक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत अदा करणे आवश्यक आहे.
त्यानुषंगाने आयुक्त कार्यालयाने पत्रान्वये केलेल्या अनुसरून रु. १८७,१५,६५,०७३/- इतकी रक्कम पिक विमा हप्ता अनुदान कोटी विमा कंपन्या वितरीत करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
२६ ऑगस्ट २०२२ शासन निर्णय येथे पहा
हेही पहा
👇