PM kisan निधी योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट पूर्वी मोबाईल क्रमांक दुरुस्ती

 PM kisan निधी योजनेअंतर्गत 31 ऑगस्ट पूर्वी मोबाईल क्रमांक दुरुस्ती 

pm kisan mobile number update

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांनी नोंदणी करताना नजीकच्या महा ई-सेवा केंद्र अथवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून पी.एम. किसान पोर्टलवर फार्मर कॉर्नर या पर्यायातील अपडेट मोबाईल नंबर या सुविधेच्या माध्यमातून मोबाईल क्रमांकाची दिनांक 31 ऑगस्ट 2024 पूर्वी दुरुस्ती पूर्ण करुन घ्यावी. दिनांक 31 ऑगस्ट नंतर ही सुविधा उपलब्ध राहणार नसल्याने या अगोदर मोबाईल क्रमांक दुरुस्तीची कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अजय कुलकर्णी यांनी केले आहे.



पी.एम.किसान योजनेसाठी नोंदणी करताना यापूर्वी लाभार्थ्यांचा एक मोबाईल क्रमांक अनेक नोंदणीसाठी वापरण्यात आले आहेत. पोर्टलवर डाटा अपलोड करताना चुकीचे मोबाईल क्रमांक देखील नमुद करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी केंद्र शासनाने अशा प्रकारच्या मोबाईल क्रमांकामध्ये दिनांक 31 ऑगस्ट 2024 पूर्वी दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहितीही श्री. कुलकर्णी यांनी दिली आहे.