कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन || Soyabin Anudan KYC

कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आवाहन

Soyabin Anudan KYC

Soyabin Anudan KYC


सन 2023 खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २ हेक्टर मर्यादेत प्रति हे. ५ हजार रू. मदत देण्यात येत आहे. पात्र शेतक-यांनी आधार संमतीसह नाहरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारीपूर्वी कृषी सहायकाकडे सादर करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

खरीप २०२३ मध्ये  ई-पीक पाहणी केलेले कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकरी, ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवर नोंद  केली नाही तथापि, सातबारा उताऱ्यावर पीकाची नोंद आहे असे खातेदार, खरीप २०२३ कापूस, सोयाबीन उत्पादक वैयक्तिक व सामाईक खातेदार पात्र आहेत. पात्र शेतक-यांनी ई-पीक पाहणी पोर्टलवरील यादीत आपले नाव असल्याबाबत खातरजमा www.scagridbt.mahait.org या पोर्टलवर किंवा संबधित कृषी सहाय्यक यांच्याकडून करुन घ्यावी, तसेच ज्या शेतकऱ्यांनी  खरीप २०२३ मध्ये  ई- पीक पाहणी पोर्टलवर नोंद केली नाही तथापि, सातबा-यावर नोंद आहे अशा शेतकऱ्यांनी गावातील तलाठी यांच्याशी संपर्क  साधावा.

 वनपट्टेधारक खातेदार असतील तर त्यांनी तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयाशी  संपर्क साधावा. 

अर्थसहाय्य योजनेचा लाभ  घेण्यासाठी वैयक्तिक खातेदारांना आपले आधार संमती व सामाईक खातेदारांना आधार संमतीसह नाहरकत प्रमाणपत्र २८ फेब्रुवारीपर्यंत संबधित कृषी सहाय्यक यांचेकडे सादर करणे आवश्यक  आहे. त्याचे नमुने कृषी  सहायकांकडे उपलब्ध आहेत. 

Arj Namuna PDF

👇👇

SOYABIN KAPUS BHAVANTAR YOJANA




खरीप २०२३ हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी खातेदारांनी ई-केवायसी करणे आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांनी अद्याप   ई-केवायसी केले नाही त्यांनी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क करून ई-केवायसी करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.



राज्यातील सन २०२३ च्या खरीप हंगामातील ई-पिक पहाणी पोर्टलवरील नोंदणीकृत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ०.२ हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट रु. १००० तर ०.२ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रती हेक्टर रु.५,००० (२ हेक्टरच्या मर्यादेत) अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.  याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर कापूस सोयाबीन ची नोंद आहे, वनपट्टा धारक शेतकरी, ज्या गावातील भूमी अभिलेख संगणकीकरण झाले नाही, अशा गावातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी यांना हा लाभ देण्यात येणार आहे .

हे अर्थसहाय्य खातेदारांच्या आधार संलग्न बॅंक खात्यात डीबीटीच्या माध्यमातून  जमा करण्यात येणार आहे. यासाठी सर्वसाधारण ९६ लाख खातेदारांपैकी  ६८ लाख खातेदारांनी आपले आधार संमती दिली आहे. या पैकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत ४६.६८ लाख आधार क्रमांक जुळले आहेत. यांचे ई-केवायसी करण्याची आवश्यकता नाही. मात्र या व्यतिरिक्त २१.३८ लाख खातेदार यांनी त्यांचे आधार ई-केवायसी करणे आवश्यक आहे. यापैकी २.३० लाख खातेदार यांनी  २५ सप्टेंबर २०२४ अखेर ई-केवायसी पूर्ण केले आहे. याव्यतिरिक्त शिल्लक १९ लाख खातेदार यांचे करिता https://scagridbt.mahait.org/ या पोर्टलवर खालीलप्रमाणे सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे.

ज्या शेतकऱ्यांचे ई-केवायसी करावयाचे आहे, त्यांची यादी गावात प्रदर्शित करण्यात आलेली आहे. या शेतकऱ्यांनी संबंधित कृषि सहाय्यकाशी संपर्क साधावा. कृषि सहाय्यक त्यांचे लॉगीन मध्ये उपलब्ध सुविधेद्वारे संबंधित खातेदाराच्या आधार संलग्न मोबाईल क्रमांकावर येणाऱ्या ओटीपीच्या माध्यमातून ई-केवायसी करतील. तसेच शेतकरी स्वतः सुद्धा या पोर्टलवर जाऊन ओटीपीच्या माध्यमातून किंवा बायोमॅट्रीकच्या माध्यमातून सेवा सुविधा केंद्रात सीएसी (CSC) जावून सुद्धा ई-केवायसी करु शकतात. याकरिता पोर्टलच्या मुख्य पानावर डिस्बर्समेंट स्टेट्स (Disbursement status) येथे क्लिक केल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक टाकावा. नंतर मोबाईलवर प्राप्त ओटीपी किंवा सीएसी केंद्रातील बायोमेट्रीक मशिनच्या माध्यमातून ते ई-केवायसी पूर्ण करु शकतात. तरी शेतकऱ्यांनी तात्काळ ई-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन कृषि विभागामार्फत करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या कृषी कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.