सोयाबीनची हेक्टरी उत्पादकता जाहीर
Soybean msp procurement
केंद्र शासनाच्या माध्यमातून जाहीर केलेल्या हमीभाव नुसार राज्यात सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू झाली आहेत.
या खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांकडून सोयाबीनच्या प्रति हेक्टर खरेदी संदर्भात कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४ साठी सोयाबीन उत्पादकतेचा पहिला अंदाज जाहीर केला आहे.
या अंदाजात राज्यात सातारा जिल्ह्याची उत्पादकता सर्वाधिक २६ क्विंटल, कोल्हापूर जिल्ह्याची २३ क्विंटल जाहीर झाली आहे. सर्वांत कमी गडचिरोली जिल्ह्याची ६.५६ जाहीर झाली आहे तर पाठोपाठ बीड ९.५० क्विंटल आहे. या उत्पादकतेनुसार शासकीय खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना सोयाबीन देता येईल.