अखेर सोयाबीन हमीभाव खरेदीला मुदतवाढ || soybean msp Procurement 2025

अखेर सोयाबीन हमीभाव खरेदीला मुदतवाढ

 soybean msp Procurement 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोयाबीन खरेदीस मुदतवाढ देण्याची केलेली मागणी केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लगेच मंजूर करीत ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे.



सोयाबीन हमीभाव खरेदी साठी ची १२ जानेवारीला मुदत संपल्यानंतर अखेर आज केंद्राने सोयाबीन खेरदीला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे.


आज ही राज्यात जवळजवळ नोंदणीकृत ५ लाख ३९ हजार शेतकरी हे आपल्या सोयाबीन हमीभाव खरेदीची वाट पाहत आहेत. राज्यात आता पर्यंत ५ लाख ३८ हजार टन खरेदी करण्यात आली असून राज्यात एकूण १४ लाख १३ हजार खेरदीचे उद्दीष्ट आहे.

पुढील मुदतीत होणाऱ्या सोयाबीन खरेदीसाठी बारदाणा पुढील दोन दिवसांमध्ये उपलब्ध होईल, अशी माहीतीदेखील पणन विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यातील ७ लाख ४९ हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. पण प्रत्यक्षात १२ जानेवारीपर्यंत राज्यातील २ लाख १० हजार शेतकऱ्यांचेच सोयाबीन खरेदी करण्यात आले. म्हणजेच एकूण नोंदणी केलेल्या केवळ २८ टक्के शेतकऱ्यांचेच सोयाबीन खरेदी करण्यात आले. आजही ७२ टक्के शेतकरी सोयाबीन विक्रीची वाट पाहत आहेत.सरकारने राज्यात १४ लाख १३ हजार टन खरेदीचे उद्दीष्ट ठेवले असले तरी प्रत्यक्षात मात्र आतापर्यंत ५ लाख ३८ हजार टनांचीच खरेदी पूर्ण झाली. म्हणजेच केवळ ३८ टक्केच खरेदी पूर्ण झाली. आणखी सरकारला ६२ टक्के उद्दीष्ट पूर्ण करायचे आहे.

सरकारने मागील ९० दिवसांमध्ये एकूण नोंदणी झालेल्या केवळ २८ टक्के शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी केले. आजही ७२ टक्के शेतकरी खरेदीची वाट पाहत आहेत. खुल्या बाजारात सध्या हमीभावापेक्षा किमान ९०० ते १ हजार रुपये कमी भाव सोयाबीनला मिळत आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 

शेतकरी दोन महिन्यांपासून सरकारला सोयाबीन देण्यासाठी थांबले आहेत. त्यामुळे किमान नोंदणी झालेल्या सर्व शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.