शेततळे अनुदान योजना मनरेगा
अटी पात्रता निकष अनुदान कागदपत्रं
shettale anudan yojana mgnarega
पहा पूर्ण माहितीचा video
👇
अटी पात्रता निकष
- महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतील लाभार्थी निवड निकषानुसार लाभार्थी निवडीसाठी शेतकरी पात्र असावा .
- शेतकर्याकडे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड असणे बंधनकारक.
- मनरेगा योजनेतील पात्र लाभार्थी याने मागेल त्याला शेततळे योजनेत अर्ज करून त्यास तालुका स्तरीय समितीची मान्यता आवश्यक आहे.
- या ग्राह्य लाभर्थ्याने शेततळ्याचे सुरूवातीचे 0.50 मीटर खोदण्याचे काम मनरेगा योजनेतील मजुराद्वारे करावयाचे आहे. आणि नंतरचे 2.50 मीटर खोदण्याचे काम तो मागेल त्याला शेततळे योजनेप्रमाणे करू शकेल.
- मनरेगा योजनेतील मार्गदर्शक तत्वांनुसार लाभार्थीस ग्रामसभेची मंजूरी आवश्यक आहे.
मनरेगा अंतर्गत लाभार्थी निवडीचे निकष:
शेततळे खोदण्यासाठी खालील प्रवर्गातील शेतकर्यांना या बाबींचा लाभ घेता येतो. यासाठी लाभार्थीकडे मालकी हक्काची जमिन आवश्यक असून या कामासाठी योजनेच्या निकषाप्रमाणे ग्रामसभेची मान्यता आवश्यक असून लाभार्थीने योजनेंतर्गत जॉब कार्ड काढणे आवश्यक आहे.
- अनुसुचित जाती.
- अनुसुचित जमाती.
- भटक्या जमाती.
- भटक्या विमुक्त जमाती.
- दारिद्रय रेषेखालील इतर कुटुंबे.
- महिला प्रधान कुटुंबे.
- शारिरिक अपंगत्व प्रधान असलेली कुटुंबे.
- भुसुधार योजनेचे लाभार्थी.
- इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी.
- अनुसुचित जमातीचे व अन्य परंपरागत वन्य निवासी (वन अधिकार मान्यता) अधिनियम 2006 नुसार पात्र व्यक्ती.
- कृषी कर्ज माफी योजना सन 2008 नुसार अल्पभूधारक (2 हेक्टरपर्यंत) जमीन असलेले शेतकरी (जमिन मालक/कुळ)
shettale application form