कुसूम योजनेसाठी शेतकऱ्यांना फसव्या वेबसाइटवर पैसे न भरण्याचा MNRE चा इशारा !
PM Kusum payment
MNRE चे PM कुसुम योजने साठी शेतकऱ्यांना आवाहन
शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय कुसुम कृषी सौर पंप (MNRE PM-KUSUM ) योजना राबवत आहे,
या योजने अंतर्गत स्वतंत्र सौर पंप स्थापित करण्यासाठी आणि कृषी पंपांच्या सौरीकरणासाठी अनुदान दिले जाते. ही योजना राज्य सरकारच्या नियुक्त विभागांद्वारे राबविण्यात येत आहे. लाभार्थी शेतकऱ्याने त्यांचा हिस्सा राज्य सरकारच्या नियुक्त विभागाकडे भरण्यास सांगितल्या नंतर जमा करावा.
MNRE ला असे दिसून आले की काही अनधिकृत वेबसाइट्सनी PM-KUSUM योजनेसाठी नोंदणी पोर्टल असल्याचा दावा केला आहे. अशा वेबसाइट्स या बनावट नोंदणी पोर्टलद्वारे सर्वसामान्य शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत.
अशा वेबसाइट्स आणि अशा वेबसाइट्सवर कोणतीही माहिती सामायिक करण्यापासून सावध रहा.
अशा वेबसाइट्सची माहिती मिळाल्यावर एमएनआरईकडून कारवाई केली जाते आहे.
मात्र अलीकडे असे लक्षात आले आहे की काही नवीन वेबसाइट्स जसे कि (https://www.kisankusumyojana-reg.org/ आणि http://kusumyojanaonline.com/ PM-KUSUM योजनेसाठी आपल्या वेबसाईट वर नोंदणी पोर्टल असल्याचा दावा करत आहेत. शिवाय, WhatsApp वर संभाव्य लाभार्थ्यांची दिशाभूल करण्यासाठी आणि त्यांच्याकडून पैसे मागण्यासाठी इतर मार्गांचा देखील वापर केला जात आहे.
त्यामुळे, सर्व संभाव्य लाभार्थी आणि सामान्य जनतेला पुन्हा सूचित करण्यात येते की, अशा फसव्या वेबसाइटवर पैसे किंवा माहिती जमा करणे टाळावे. PM-KUSUM योजनेंतर्गत नोंदणी पोर्टल असल्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही असत्यापित किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नका,
योजनेतील सहभागासाठी पात्रता आणि अंमलबजावणी प्रक्रियेबाबत माहिती करीत mahaurja च्या अधिकृत वेबसाईट वर https://www.mahaurja.com/meda/portal किव्हा MNRE वेबसाइट http://www.mnre.gov.in आणि टोल फ्री क्रमांक १८००-१८०-३३३३ वर उपलब्ध आहे.