दुधाळ गाई म्हशी गट वाटपासाठी अर्ज सुरु
gai mhashi gat vatap yojana 2022
gai mhashi gat vatap yojana 2022 |
केंद्र शासनाच्या विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत सन २०२१ - २२ वर्षांसाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,तळोदा कार्यक्षेत्रातील अक्कलकुवा, अक्राणी व तळोदा तालुक्यातील आदिवासी महिला बचत गटांना दुधाळ जनावरांचे गट वाटपासाठी ( gai mhashi gat vatap yojana 2022 ) अनुसूचित जमातीच्या महिला बचत गटानी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ.मैनाक घोष व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. उमेश पाटील यांनी केले आहे.
या योजनेसाठी दिव्यांग, विधवा, परितक्त्या स्त्रिया, अल्प भूधारक, महिलां यांनी 14 ते 23 जानेवारी 2022 या कालावधीत अर्ज सादर करावेत.
gai mhashi gat vatap yojana 2022 योजनेसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येतील.
या योजनेत संकरित गाय - एच.एफ. / जर्सी म्हैस - मुऱ्हा / जाफराबादी
देशी गाय – गीर, साहिवाल, रेड सिंधी, राठी, थारपारकर देवनी, लाल कंधारी, गवळाऊ व डांगी या जातींच्या गाई म्हशी घेता येतील .
• लाभार्थी निवडीचे निकष
- लाभार्थी ही आदिवासी महिला बचत गटातील सदस्य असणे अनिवार्य राहिल.
- लाभार्थी सदस्य असलेला महिला बचत गट हा नोंदणीकृत असावा.
- महिला बचत गट ज्या यंत्रणे अंतर्गत स्थापन केलेला आहे त्यांचे बचत गट चालू स्थितीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील.
- अपंग, विधवा, परितकत्या, अल्प भूधारक महिलांना प्राधान्य देण्यात यावे.
- लाभार्थीकडे ओलिताखालील क्षेत्र व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता असणे आवश्यक राहील. किमान २० गुंठे क्षेत्र सिंचनाखाली आवश्यक असून ७/१२ उतारा /८ उतारावर नोंद असणे आवश्यक आहे. तसेच सुखा चारा उपलब्ध करून द्यावा.
- सदस्यांकडे किमान ४ गायीकरिता गोठ्यांची उपलब्धता असावी.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचे लाभ देण्यात यावा.
- लाभार्त्याने किंवा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी मागील ३ वर्ष सदर योजनेचा लाभ यापूर्वी आदिवासी विकास विभाग अथवा इतर कोणत्याही शासकीय विभाकडून घेतला नसल्याबाबत हमी पत्र सादर करणे आवश्यक राहील.
- लाभार्त्याने दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण घेतलेले शासन मान्य संस्थेचे प्रमाणपत्र (उदा. प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, प्रमोद महाजन कौशल्य विकास योजना, दीनदयाल कौशल्य विकास योजना,जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र उद्योजगकता विकास केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, राष्ट्रीय कृत बँक, कृषी विद्यापीठ, आत्मा ई.) यांना प्राधान्य देण्यात यावे.
1 | संकरित गाईचा गट - प्रति गाय रु. ५५,०००/- प्रमाणे | १,१०,००० |
2 | प्रति गाय विमा रु. २,७५०/- (३ वर्षासाठी) | ५,५०० |
3 | वाहतुक खर्च प्रती लाभार्थी | ४,५०० |
एकूण प्रकल्प किंमत | १,२०,००० |