help to farmer about government schemes, Government GR, mahadbt farmer scheme, solar pump scheme
खरीप हंगाम सन 2022 खरीप पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर.|| kharip hangam final paisevari
खरीप हंगाम सन 2022 खरीप पिकाची अंतीम पैसेवारी जाहीर.
kharip final paisewari 2022
खरीप पिकांची अंतिम पैसेवारी जाहीर झाली असून ५० पैशा पेक्षा कमी पैसेवारी असणारे जिल्हे आता नुकसान भरपाई स पात्र असणार आहेत.
अकोला जिल्हा
अकोला जिल्ह्याची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४८ पैसे
सन 2022-23 या वर्षाकरीता तहसिलदार यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी अंतिम पैसेवारी 48 पैसा इतकी जाहिर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
तालुक्यानिहाय हंगामी पैसेवारी याप्रमाणे :
अकोलाचे 45 पैसे, अकोट 48 पैसे, तेल्हारा 47 पैसे, बाळापूर 51 पैसे, पातूर 51 पैसे, मुर्तिजापूर 46 पैसे तर बार्शीटाकळी 50 पैसे असे सरासरी 48 पैस निश्चित करण्यात आली आहे.
यवतमाळ जिल्हा
यवतमाळ जिल्हा खरीप पिकांची 2022 ची अंतिम आणेवारी / अंतिम पैसेवारी जाहीर.
सन 2022-23 या वर्षाकरीता तहसिलदार यांच्याकडुन प्राप्त झालेल्या प्रस्तावानुसार खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी अंतिम पैसेवारी 47 पैसा इतकी जाहिर करण्यात आली आहे, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
वाशिम जिल्हयाची खरीप पिकांची अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी ४७ पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. जिल्ह्यात एकूण ७९३ महसूल गावे आहेत. यातील सर्वच ७९३ गावांची खरीप हंगामाची नजर अंदाज पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे.
वाशिम तालुक्यात एकूण १३१ महसुली गावे आहेत.या सर्व १३१ गावांची पैसेवारी ४७ पैसे इतकी आहे.
मालेगाव तालुक्यातील १२२ गावे आहे, या १२२ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.
रिसोड तालुक्यात १०० महसूली गावे असून या सर्व १०० गावांची हंगामी पैसेवारी ४६ पैसे आहे.
मंगरुळपीर तालुक्यात १३७ महसूल गावे असून या सर्व गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.
कारंजा तालुक्यात एकूण १६७ महसूली गावांची पैसेवारी ४७ पैसे.
मानोरा तालुक्यातील सर्व १३६ गावांची पैसेवारी ४७ पैसे आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी सरासरी ४७ पैसे इतकी आढळून आली आहे.
हिंगोली जिल्हा
हिंगोली जिल्हा अंतिम पैसेवारी जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आली.
पावसाळ्यात अनेकवेळा झालेली अतिवृष्टी, सततच्या पावसामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात घट आली. जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीनुसार जिल्ह्यातील सर्व ७०७ गावांची अंतिम पैसेवारी ५० पैसेपेक्षा कमी म्हणजेच सरासरी ४७.३२ पैसे आली असल्याचे जाहीर केले.
तालुकानिहाय
हिंगोली १५२ गाव ४९.०३ पैसे
कळमनुरी १४८ गाव ४७.५९ पैसे
वसमत १५२ गाव ४२.०० पैसे
औंढा नागनाथ १२२ गाव ४९.३० पैसे
सेनगाव १३३ गाव ४९.६६ पैसे
संभाजीनगर जिल्हा
संभाजीनगर जिल्ह्यात एकूण १ हजार ३८५ पैकी १ हजार २२४ गावे खरीप तर १६१ रब्बी गावे आहेत यातील खरीप व रब्बीचे मिळून १ हजार ३५६ गावांची पैसेवारी काढण्यात आली तर २९ गाव उजाड गावं म्हणून नोंदवली गेली आहेत.
जिल्ह्यातील खरिपांच्या १ हजार १९५ तर रब्बीच्या १६१ गावांची पैसेवारी ५० पैशापेक्षा कमी आली आहे.अशी माहिती महसूल अधिकाऱ्यांनी दिली.
तालुका निहाय अंतिम पैसेवारी
औरंगाबाद ४८.४२ पैसे
पैठण ४८.०० पैसे
फुलंबी ४८.०० पैसे
वैजापूर ४५.०० पैसे
गंगापूर ४८.७२ पैसे
खुलताबाद ४७.०८ पैसे
सिलोड ४८.०० पैसे
कन्नड ४९.०० पैसे
सोयगाव ४८.०० पैसे
संभाजीनगर जिल्हा एकूण ४७.८६ पैसे
अमरावती जिल्हा
तालुकानिहाय अंतिम आनेवारी
अमरावती – ४६
भातकुली - ४७
तिवसा ४७
चांदुर रेल्वे - ४७
धामणगांव - ४६
नांदगांव खंडे.- ४७
मोर्शी - ४१
वरूड – ४३
अचलपुर – ४८
चांदूर बाजार – ४६
दर्यापुर ४८ -
अंजनगांव - ४८
धारणी ४७
चिखलदरा – ४७
गडचिरोली जिल्हा
गडचिरोली जिल्हयात एकूण 1689 गावे असून, खरीप पिकाची गावे 1548 आहेत.
खरीप गावामध्ये पीके नसलेली गांवे 52 आहेत. सदर खरीप पिक असलेल्या गावापैकी 50 पैशाचे आत पैसेवारी असलेले खरीप गावे 0 असून, 50 पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकुण खरीप पिक असलेल्या गावांची संख्या 1504 आहेत.
अशा प्रकारे एकूण 1504 खरीप पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे.
गडचिरोली जिल्हयाची खरीप हंगाम 2022-23 या वर्षाची अंतीम पैसेवारी 0.66 आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे
गोंदिया जिल्हा
सन २०२२-२३ च्या खरीप हंगामातील प्रमुख पिकांची गोंदिया जिल्ह्याची सरासरी हंगामी पैसेवारी 89 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे.
गोंदिया जिल्ह्यात 955 महसूली गावे असून 919 गावात पीक लागवड करण्यात आली.तर 36 गावात पीक लागवड झालेली नाही. 6 गावांची पैसेवारी 50 पैशाच्या आत तर 913 गावांची पैसेवारी ही 50 पैशाच्यावर आहे.
गोदिया जिल्ह्यातील गोंदिया तालुक्याची पैसेवारी 87 पैसे,
गोरेगाव तालुका 94 पैसे,
तिरोडा 78 पैसे,
अर्जुनी मोर 88 पैसे,
देवरी तालुका 1.03 पैसे,
आमगाव तालुका 88 पैसे,
सालेकसा तालुका 85 पैसे
सडक अर्जुनी तालुक्याची अंतिम पैसेवारी 88 पैसे अशी जिल्ह्याची पैसेवारी 89 पैसे काढण्यात आली आहे.
वर्धा जिल्हा अंतिम आणेवारी
वर्धा जिल्ह्यामध्ये १३७८ गावे असून, खरिपाची सुधारित आणि अंतिम पैसेवारी जाहीर करताना यातील ४८ गावे प्रकल्पांतर्गत शहरीकरण किंवा अन्य कारणांमुळे वगळण्यात आली. यात वर्धा, देवळी, हिंगणघाट व कारंजा तालुक्यातील प्रत्येकी एक, तर सेलू तालुक्यातील नऊ, समुद्रपूर तालुक्यातील तीन, आर्वी तालुक्यातील १४ आणि आष्टी तालुक्यातील १८ गावांचा समावेश आहे.
२०२१ 👇
बुलढाणा जिल्हा
बुलडाणा जिल्हा खरिप हंगाम ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी आली आहे.
यावप्रमाने परभणी जिल्ह्यातील सर्व ८४८ गावांची अंतिम हंगामी पैसेवारी सरासरी ४७.६० पैसे आली आहे.
परभणी जिल्ह्यात एकूण ८५२ गावे आहेत. बलसा (ता. परभणी) संपूर्ण कृषी क्षेत्र कृषी विद्यापीठासाठी, तर करजखेडा (ता. सेलू), चौधरणी खुर्द (ता. जिंतूर), लिंबाळा (ता. जिंतूर) या गावांचे संपूर्ण कृषी क्षेत्र धरणांसाठी संपादित झाली. त्यामुळे ८४८ गावे पैसेवारीसाठी पात्र आहेत.
हिंगोली जिल्हा
हिंगोली जिल्ह्याची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे.
यात हिंगोली जिल्ह्यातील ७०७ गावांची पैसेवारी ४५.९९ पैसे आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात ३.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होती,
यात प्रामुख्याने सोयाबीन, त्यापाठोपाठ कापूस तूर मूग उडीद ज्वारी पिकांची पेरणी झाली होती.
गडचिरोली जिल्हा
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८९ गाव असून यात १५४८ गावात खरिपाची पेरणी होती,
यापैकी १२१ गावांची ५० पैसा पेक्षा कमी पैसेवारी लागली आहे तर उर्वरित १३७७ गावात ६१ पैसे पैसेवारी लागली आहे.
aaa
नांदेड जिल्हा
नांदेड जिल्ह्याचा सुधारित अंदाज ३१ ऑक्टोंबर रोजी जाहीर झाला. यात सर्वच सोळा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांच्या खाली जाहीर केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर
गोंदिया जिल्ह्याची 0.81 पैसे अंतिम पीक आणेवारी जाहीर केली आहे.
जिल्ह्यातील 955 गावांपैकी एकाही गावांची पैसेवारी 60 पैसेच्या आत नाही. आजघडीला गत वर्षीच्या तुलनेत धान खरेदी कमी असताना प्रशासनाची ही पैसेवारी अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे.
जिल्ह्यात खरीप हंगामातील 2 लाख 1 हजार 409 हेक्टर आर लागवड क्षेत्रापैकी 1 लाख 91 हजार 553 हेक्टर क्षेत्रात खरीप हंगामात धानाचे तर उर्वरित क्षेत्रात इतर पिकांची लागवड करण्यात आली होती.
सन 2021-22 या वर्षाची खरीप पिकाची अंतिम पैसेवारी जाहीर केली. जिल्ह्यात 955 गावे आहेत.
त्यापैकी खरीप पिकांची गावे 919 तर पीक लागवड नसलेली 36 गावे आहेत.
तालुकानिहाय पैसेवारीच्या आकडेवारीमध्ये
गोंदिया 0.95,
गोरेगाव 0.80,
तिरोडा 0.77,
अर्जुनी मोरगाव 0.81,
देवरी 0.90,
आमगाव 0.85,
सालेकसा 0.72,
सडक अर्जुनी 0.64 टक्के पैसेवारी आहे.
जिल्ह्याची हंगामी नजरअंदाज पैसेवारी 0.90 पैसे तर हंगामी सुधारित पैसेवारी 0.88 पैसे होती.
गोंदिया जिल्ह्यातील 72 गावांची पैसेवारी 100 पेक्षा अधिक आहे. यात गोंदिया तालुक्या सर्वाधिक 59 गाव, गोरेगाव तालुक्लुयातील 1 गाव, तिरोडा तालुक्यातील 3, देवरी तालुक्यातील 9 गावांची पैसेवारी शंभरपेक्षा अधिक आहे. अर्जुनी-मोर, आमगाव, सालेकसा आणि सडक अर्जुनी या तालुक्यात एकही गाव 100 पैसेवारीच्या वर नाही.
याच प्रमाणे औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील सन.२०२१-२२ यावर्षाची खरीप हंगामातील पीक परिस्थिती दर्शविणारी नजर पैसेवारी ३० सप्टेंबर २०२१ रोजी प्रशासनाने जाहीर केली असून,तालुक्यातील ६९ खरीप व ९५ रब्बी अशा एकूण १६४ गावांची नजर पैसेवारी ५० पैशापेक्षा खाली आहे.